Gautam Adani; Leaps to 14th position in rich list, soon to surpass mukesh Ambani
गौतम अदानी सूसाट; श्रीमंतांच्या यादीत 14व्या स्थानावर झेप, एकाच दिवसात अब्जावधीची वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 7:56 PM1 / 5 Gautam Adani: हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे मोठा झटका सहन करणाऱ्या गौतम अदानी (Gautam Adani) यांनी जबरदस्त कमबॅक केले आहे. अदानींचा मागील 10 महिन्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. डिसेंबर 2022 मध्ये श्रीमंतांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये सामील असणाऱ्या अदानींची संपत्ती मार्चच्या सुरुवातीला 37.7 अब्ज डॉलरवर आली होती. आता त्यांनी दमदार पुनरागमन करत श्रीमंतांच्या यादीत 14 व्या स्थानावर उडी घेतली आहे. 2 / 5 आता अदानी आणि अंबानी यांच्यात फक्त 6 अब्ज डॉलर्स, म्हणजेच सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फरक आहे. अदानींची घौडदौड अशीच सुरू राहिली, तर ते लवकच अंबानींना मागे टाकत टॉप 10 यादीत येतील. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार अदानी यांची संपत्ती $86.2 अब्ज झाली आहे. यासोबतच ते ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 14व्या स्थानावर पोहोचले आहेत. 3 / 5 आता ते मुकेश अंबानींपेक्षा फक्त एक पाऊल मागे आहे. सध्या अंबानी जगातील 13वे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. अदानी यांच्या एकूण संपत्तीत एका दिवसात 3.71 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर तीन दिवसांत 16 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे. सध्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती $92.4 अब्ज आहे. अंबानींच्या संपत्तीत एका दिवसात 1.01 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 4 / 5 गेल्या 9 दिवसांत अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन संस्थेने हिंडनबर्गचा अहवाल चुकीचा ठरवल्यानंतर अदानींच्या संपत्ती वाढ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयानेही अदानींना क्लिनचीट दिली आहे. यासोबतच, भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवल्याचाही अदानी समूहाला फायदा झाला आहे. 5 / 5 ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, पहिल्या तीन स्थानांवर इलॉन मस्क ($223 अब्ज), बर्नार्ड अर्नॉल्ट ($170 अब्ज) आणि जेफ बेझोस ($169 अब्ज) आहेत. ब्लूमबर्गच्या यादीत अंबानी आणि अदानी यांच्याशिवाय आणखी 20 भारतीय अब्जाधीशांचा समावेश आहे. ज्यामध्ये शापूर मिस्त्री, शिव नाडर, सावित्री जिंदाल, अझीम प्रेमजी, राधाकिशन दमानी आणि उदय कोटक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications