शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अदानी सीमेंट क्षेत्रात नशीब आजमावणार; 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करण्याची जोरदार तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 4:52 PM

1 / 9
भारतातील अंबुजा आणि ACC सिमेंटची मूळ कंपनी Holcim Limited, आपला सिमेंट व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, हा व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत अदानी समूहाचाही (Adani Group) समावेश आहे.
2 / 9
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानी समूह भारतातील Holcim Ltd चे व्यवसाय विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे. यासाठी आगामी काळात अदानी समूह लवकरच करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापि, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि चर्चा अद्याप खंडित होऊ शकते.
3 / 9
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू ग्रुपसह इतर बोलीदारांनाही या कंपनीत रस दाखवला. Holcim आणि JSW समुहाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. तर अदानी आणि अंबुजाच्या प्रवक्त्यांकडूनही यासंदर्भात कोणती माहिती मिळालेली नाही.
4 / 9
कंपनीच्या ६३.१ टक्के भागावर नियंत्रण ठेवणारी Holcim आपली हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. अंबुजाच्या उपकंपन्यांमध्ये ACC लिमिटेडचा समावेश आहे, जी सार्वजनिरित्या व्यापारही करत आहे.
5 / 9
आपल्यावरील कर्ज कमी करण्यासाठी आणि अधिग्रहणाद्वारे विविधता आणण्यासाठी होल्सिम आपल्या नॉन कोअर संपत्तीची विक्री करत आहे. यामध्ये त्यांनी सप्टेंबर महिन्यात आपली ब्राझिलीयन कंपनीची विक्री केली होती. तसंच कंपनी आपल्या झिम्बाम्बेमधील व्यवसायाची विक्री करण्याच्याही विचारात आहे.
6 / 9
याचदरम्यान मंगळवारी शेअर बाजारात अंबुजा सीमेंटचे शेअर २.३० टक्क्यांनी वाढून ३८५ रुपयांवर बंद झाले. तर दुसरीकडे एसीसी सीमेंटच्या शेअरच्या किंमतीतही २.१२ टक्क्यांची वाढ होऊन ते २३१० रुपयांवर पोहोचले. एप्रिल महिन्यात अंबुजा सीमेंटच्या शेअर्समध्ये २६ टक्क्यांची वाढ झाली.
7 / 9
सध्या अदानी समुहाच्या कंपन्यांची शेअर बाजारात चांगली कामगिरी दिसून येत आहे. यातच देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहातील नवखी कंपनी असलेल्या Adani Wilmar ने अल्पावधीतच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अदानी विल्मरचा शेअर ८०० रुपयांवर गेला. या शेअरचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
8 / 9
गौतम अदानी यांच्या संपत्तीबरोबरच त्यांच्या समूहात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची देखील संपत्ती भरमसाठ वाढत आहे. Adani Wilmar या कंपनीच्या शेअरने मागील अडीच महिन्यात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.
9 / 9
Adani Wilmar चा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आणि त्याने ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला. या तेजीने कंपनीचे बाजार भांडवल १ लाख ४ हजार २३४ कोटी रुपये इतके वाढले आहे. हा शेअर सार्वकालीन उच्चांकावर ट्रेड करत आहे. अदानी विल्मर कंपनीची फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्य तेल, पीठ, मैदा यासारखे उत्पादने आहेत.
टॅग्स :Adaniअदानीshare marketशेअर बाजारIndiaभारत