शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani Networth: गौतम अदानी सूसाट...एका दिवसात 42 हजार कोटींची वाढ; लवकरच बेजोस यांना मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 2:55 PM

1 / 10
या आठवड्यात जगातील श्रीमंतांच्या यादीत (World's Rich List) टॉप-3 मध्ये दाखल झालेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या उसळीमुळे गेल्या एका दिवसात अदानींच्या संपत्तीत $5.29 अब्ज (सुमारे 42 हजार कोटी रुपये) वाढ झाली आहे.
2 / 10
यामुळे आता गौतम अदानी आणि जगातील दुसरे सर्वात श्रीमंत जेफ बेझोस (Jeff Bezos Networth) यांच्यातील दरी कमी झाली आहे. जर अदानी यांच्या संपत्तीत अशीच वाढ होत गेली, तर येत्या काही दिवसांत ते बेझोस यांना मागे टाकून जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात.
3 / 10
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर अदानींची एकूण संपत्ती $5.29 अब्जने वाढून $143 अब्ज झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेझोस यांची एकूण संपत्ती सध्या $152 अब्ज आहे. विशेष म्हणजे, काल बेझोस यांची संपत्ती $01 बिलियनने घसरली आहे.
4 / 10
म्हणजेच आता दोघांमध्ये फक्त $9 अब्जांचे अंतर आहे. एक दिवस आधी अदानी आणि बेझोस यांच्या संपत्तीत $16 अब्जांची तफावत होती. अदानी यांनी या आठवड्यात बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकले. अशाप्रकारे, अदानी केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिली व्यक्ती ठरले, जे श्रीमंतांच्या यादीत टॉप-3 मध्ये सामील झाले आहेत.
5 / 10
गेल्या 24 तासांत रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनाही मोठा फायदा झाला आहे. या दरम्यान अंबानींच्या संपत्तीत $2.04 बिलियनची वाढ झाली आणि आता अंबानींची एकूण संपत्ती (Mukesh Ambani Total Networth)$94 बिलियन झाली आहे.
6 / 10
या वाढीसह, ब्लूमबर्गच्या श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये सामील झाले आहेत. आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन ब्लूमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीत 9व्या स्थानावर पोहोचले आहेत. एक दिवस आधी ते या यादीत 11व्या स्थानावर होते. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क अजूनही मोठ्या फरकाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
7 / 10
सध्या, मस्क ही एकमेव श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची एकूण संपत्ती $200 बिलियन पेक्षा जास्त आहे. मात्र, गेल्या 24 तासांत मस्क यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घट झाली आहे. एका दिवसापूर्वी त्यांची एकूण संपत्ती 251 अब्ज डॉलर होती, जी आता 247 अब्ज डॉलरवर आली आहे. मस्कची एकूण संपत्ती या वर्षात आतापर्यंत 23.8 अब्ज डॉलरने घसरली आहे.
8 / 10
जेफ बेझोस यांना 2022 मध्ये आतापर्यंत $40.1 बिलियनचे नुकसान झाले आहे. अदानी हे एकमेव धनकुबेर टॉप-5 मध्ये आहेत, ज्यांना यावर्षी फायदा झाला आहे. गौतम अदानी यांच्यासाठी 2022 हे वर्ष लकी ठरले आहे. 2022 मध्ये आत्तापर्यंत त्यांची एकूण संपत्ती $66.2 अब्जाने वाढली आहे. या काळात टॉप-5 मध्ये असलेल्या बर्नार्ड अर्नल्टचे $40.8 बिलियन आणि बिल गेट्सचे $21.8 बिलियनचे नुकसान झाले.
9 / 10
गेल्या महिन्यात बर्नार्ड अर्नल्टला मागे टाकण्यापूर्वी गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचले होते. गेट्स यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजसेवेसाठी दान केला, ज्यामुळे त्यांची संपत्ती क्षणार्धात खूपच कमी झाली.
10 / 10
दुसरीकडे, अदानींच्या कंपन्यांनी सातत्याने चांगली कामगिरी करत शेअर बाजाराला मात दिली, त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती वाढली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अदानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. अदानींच्या एकूण संपत्तीने या वर्षी एप्रिलमध्ये प्रथमच $100 अब्जचा टप्पा ओलांडला.
टॅग्स :AdaniअदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीInvestmentगुंतवणूक