शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 3:15 PM

1 / 6
adani vs hindenberg : अदाना समुहाविरोधातील हिंडेनबर्गची रिपोर्ट आल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर असलेले अदानी आता टॉप-20 मधून बाहेर पडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. अडानीची कंपनी ग्रीन एनर्जी लिमिटेडला श्रीलंकेतील ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठे कंत्राट मिळाले आहे. श्रीलंकेच्या गुंतवणूक मंडळाने कंपनीला मन्नार आणि पुणेरीन येथे दोन पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे.
2 / 6
कंपनीला हा $442 मिलियनचा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याअंतर्गत 500 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल, जी 2025 पर्यंत श्रीलंकेच्या नॅशनल ग्रीडशी जोडली जाणार आहे. रिपोर्टनुसार, या करारानंतर आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेत सुमारे दोन हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासोबतच हे मोठे कंत्राट मिळाल्याने अदानींच्या कंपनीला आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासही मदत होणार आहे.
3 / 6
आधी हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये शेअर्समध्ये घसणर झाली, त्यानंतर भारतातील विरोधी पक्षांनीही सरकार आणि अदानींवर गंभीर आरोप केले. केंद्र सरकारच्या दबावामुळे अदानी समूहाला श्रीलंकेसह अनेक देशांमध्ये मोठी कंत्राटे मिळाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या आरोपांनंतरही अदानीला श्रीलंकेत एवढा मोठा प्रकल्प मिळाल्याने कंपनीला मोठा दिलासा मानला जात आहे.
4 / 6
बुधवारीच श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकरा यांनी अदानी अदानी समूहासोबत ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीवर चर्चा करण्याबाबत वक्तव्य केले होते. या प्रकल्पाबाबत श्रीलंका आणि एदानी यांच्यात बराच काळ चर्चा सुरू होती. याला आता अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. कंपनी आधीच कोलंबोमध्ये ऊर्जा विकासावर काम करत आहे.
5 / 6
कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण होत असताना अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला हे कंत्राट मिळाले आहे. समूहाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे आधीच मार्केट कॅपवर परिणाम झाला आहे. यामध्ये सुमारे आठ लाख कोटी रुपयांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यापासून अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सुमारे 71.88 टक्क्यांनी घसरले आहेत. अशा परिस्थितीत श्रीलंकेत एवढा मोठा प्रकल्प मिळणे हे कंपनीसाठी मोठे यश आहे.
6 / 6
अदानी समूहाला केवळ नफा झाला असे नाही. समूहाने अनेक करारही गमावले आहेत. या फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने अदानी समूहाला दिलेले स्मार्ट प्रीपेड वीज मीटरचे मोठे कंत्राट खराब दर्जामुळे रद्द केले होते. याआधी ऊर्जा क्षेत्रातील आणखी एका कंपनीनेही अदानी समूहासोबतच्या करारावर दुसरा विचार करण्याबाबत बोलले आहे. त्यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे. पण या मोठ्या धक्क्यातून कंपनी सावरण्यात यशस्वी होईल, असे अनेक बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीSri Lankaश्रीलंकाbusinessव्यवसायcongressकाँग्रेसBJPभाजपा