शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani News : एक निर्णय आणि अर्ध्या तासात कमावले ५३ हजार कोटी, अदानींचं सुपर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 12:09 PM

1 / 8
अदानी कुटुंबाने एका दिवसापूर्वी चार कंपन्यांचे १७ कोटींहून अधिक शेअर्स विकले आणि १५,००० कोटी रुपये उभे केले. या पावलानंतर शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली.
2 / 8
या तेजीमुळे अवघ्या ३० मिनिटांत अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे ५३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे, ज्याच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
3 / 8
कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची तेजी दिसून आली होती. तर अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्येही मोठी तेजी दिसून आली होती. याशिवाय अदानी पॉवरच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. हा शेअर १६९.४५ रुपयांवर आला. तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागून शेअर ७४३.७५ रुपयांवर पोहोचला.
4 / 8
गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस वाढ झाली आहे. त्याचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी मोठी झेप घेतली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांनी सुपर ३० मध्ये पुनरागमन केलं आहे. यासोबतच त्यांची एकूण संपत्ती ४५ अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.
5 / 8
आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर २७ फेब्रुवारीपासून अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, गुरुवारी इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घट झाली असून, एका दिवसात त्यांचे ६४ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
6 / 8
गौतम अदानी आता जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या ३० मध्ये परतले आहेत. सध्या ते जगातील २८ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक आहेत. काही दिवसांपूर्वी ते जगातील टॉप ३० च्या यादीतून बाहेर पडले होते.
7 / 8
दुसरीकडे, गुरुवारी इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, मस्क यांच्या संपत्तीत ७.७१ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६४ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती १७६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक बनले आहेत.
8 / 8
काही दिवसांपूर्वी त्यांनी बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं होतं. सध्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचलीये. ते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजारelon muskएलन रीव्ह मस्क