शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani Group: गौतम अदानींची मोठी झेप! एका दिवसांत ४,१५,१०,०७,७०,००० ₹ची कमाई; शेअर्सही सावरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 8:54 PM

1 / 9
Gautam Adani Group: अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाचे प्रचंड नुकसान झाले. एफपीओ रद्द करण्यात आला. अनेक करारातून माघार घेण्यात आली. अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले. गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी कर्ज चुकवण्यावर भर देण्यापासून अनेकविध गोष्टी अदानी समूहाकडून करण्यात येत आहेत.
2 / 9
शेअर बाजारातील विविध नियामक बाबी तसेच अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असून, दोन महिन्यांत सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर केला जाणार आहे.
3 / 9
अदानी समूहाला झालेल्या प्रचंड तोट्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप ५ क्रमांकात असलेले गौतम अदानी ३० व्या क्रमांकाच्या बाहेरही फेकले गेले. मात्र, यातच गौतम अदानी, अदानी ग्रुप आणि गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. अदानी समूहाने एका दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यामुळे गौतम अदानी यांचे यादीतील स्थानही वधारले आहे.
4 / 9
जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांनी मोठी झेप घेतली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी आता जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत २४व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असताना गौतम अदानी नेट वर्थमध्येही वाढ झाली आहे.
5 / 9
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता ४९.८ अब्ज डॉलर झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ५.८ अब्ज डॉलरची विक्रमी उडी झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून अदानी समूहाच्या समभागात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. यासोबतच अदानींच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत अदानीची एकूण संपत्ती ११ अब्ज डॉलरने वाढली आहे.
6 / 9
शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या शेअर्समधील तेजीने LIC ला दिलासा मिळाला. LIC ला अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीने झालेल्या नुकसानाची काही प्रमाण भरपाई झाली. गेल्या तीन दिवसांत एलआयसीला ९००० कोटींचा फायदा झाल्याचे बोलले जाते. ‘एलआयसी’सह अनेक बड्या गुंतवणूकदारांचे अदानी ग्रुपमधील शेअर्सचे पोर्टफोलिओ आता पुन्हा नफ्यात आले आहेत.
7 / 9
अदानी समूहाने सिंगापूरमधील गुंतणूकदारांकडून प्राप्त केलेले कर्ज, अमेरिकी संस्थेने चार शेअर्समध्ये केलेले १५४४६ कोटींचे ब्लॉक डील या घडामोडींनी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अदानी ग्रुपचे शेअर्स सरत्या आठवड्यातील सलग तीन सत्रात तेजीत होते. त्यात अदानी एंटरप्राईजेसचा शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तेजीच्या लाटेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
8 / 9
अदानी ग्रुपच्या १० शेअर्समध्ये मागील महिनाभरात झालेल्या घसरणीने कंपन्यांचे बाजार भांडवल ११ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. हिंडेनबर्ग अहवाल बाजारात धडकण्यापूर्वी अदानी ग्रुपची मार्केट कॅप १९.२ लाख कोटी इतकी होती. सरत्या आठवड्यात अदानी ग्रुपच्या शेअरमधील तेजीचा फायदा प्रमोटर्सनी उचलला.
9 / 9
गौतम अदानी या वर्षाच्या सुरुवातीला जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापासून काही पावले दूर होते. पण २४ जानेवारीला हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी अब्जाधीशांच्या यादीत सुरुवातीला पहिल्या १०, नंतर टॉप २० आणि नंतर टॉप ३० च्या बाहेर गेले.
टॅग्स :AdaniअदानीGautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजार