शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani :गौतम अदानींची अग्निपरीक्षा! हिंडेनबर्गचा अहवाल बरोबर निघाला तर मोठी किंमत मोजावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:49 PM

1 / 9
गेल्या काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडेनबर्ग अहवाल सादर केला आहे, या अहवालात अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे आता अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
2 / 9
एकेकाळी जगातील तिसर्‍या श्रीमंत अब्जाधीशांमध्ये गणले जाणारे गौतम अदानी यांच्यासाठी सध्याचा काळ कठीण आहे. 2021-22 मध्ये ज्या रॉकेटच्या वेगाने त्यांची संपत्ती वाढली होती, त्याच वेगाने आता घट होत आहे. 24 जानेवारीला एक अहवाल समोर आला, त्यानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये घट झाली. अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे.
3 / 9
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे अदानी समुहाचा मोठा तोटा झाला आहे. अदानींचे साम्राज्य आकाशापासून पाण्यापर्यंत, रस्त्यापासून ते तुमच्या घराच्या पायापर्यंत पसरले आहे, मात्र या अहवालाने अदानींच्या व्यवसायाला हादरा दिला आहे. अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
4 / 9
दोन दिवसांत कंपन्यांचे मार्केट कॅप 22 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 4.2 लाख कोटींचा फटका बसला आहे. अदानी यांच्या स्वतःच्या संपत्तीत 22 अब्ज डॉलरची घट झाली आहे. अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर चुकीच्या पद्धतीने शेअर्सची किंमत वाढवून खात्यांमध्ये घोळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
5 / 9
हा अहवाल आल्यानंतर 24 तासांच्या आत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 22 अब्ज डॉलरची घट झाली. एकेकाळी 125 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी यांनी चोवीस तासांत 22 अब्ज डॉलर गमावले. त्यांची संपत्ती 96.6 अब्ज डॉलर इतकी कमी झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, त्यांची सध्याची मालमत्ता 92.7 बिलियनवर खाली आली आहे. 29 जानेवारी रोजी त्यांची संपत्ती थेट 27.9 अब्ज डॉलरने घटली आहे.
6 / 9
जर हिंडेनबर्गचा अहवाल बरोबर निघाला तर अदानी समूहाच्या अडचणी वाढू शकतात. या अहवालानंतर इंडेक्स सर्व्हिस प्रोव्हायडर एमएससीआयने अदानी ग्रुपच्या शेअर्सवर फीडबॅक मागवला आहे.
7 / 9
या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ग्लोबल इंडेक्स सर्व्हिस प्रोव्हायडर एमएससीआय ग्लोबल इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्सवरील कंपन्यांचे वेटेज कमी करू शकते जर हा अहवाल खरा असल्याचे आढळल्यास किंवा अदानी समूहावरील आरोप खरे असल्याचे आढळल्यास. कंपनीच्या शेअर्सवर परिणाम होईल.
8 / 9
अदानी समूहाच्या 8 कंपन्या एमएससीआय स्टँडर्ड इंडेक्सचा भाग राहिल्या आहेत. या अहवालात करण्यात आलेले आरोप खरे ठरले तर अदानींच्या शेअर्समध्ये विक्रीचे बोलबाला होऊ शकतात. विशेष म्हणजे अदानी समूह एफपीओच्या माध्यमातून 20 हजार कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत असतानाच हा अहवाल आला आहे.
9 / 9
या अहवालामुळे त्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. अदानी समूहाने हा अहवाल फेटाळला असला तरी. अहवाल जाणूनबुजून त्यांच्या एफपीओला नुकसान पोहोचवण्यासाठी आणले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीStock Marketशेअर बाजारshare marketशेअर बाजार