शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२१ व्या वर्षी मिळतील ६४ लाख, मुलीच्या भविष्यासाठी करा तरतूद; 'ही' सरकारी स्कीम आहे फायद्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 8:43 AM

1 / 8
जसजशी महागाई वाढतेय, तसतसा खर्चही वाढतोय. मुलाचं शिक्षण असो किंवा इतर खर्च, आजकाल यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे पालकांना अनेकदा चिंताही सतावत अ सते. परंतु तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक केली, तर तुम्ही यातून सुटका मिळवू शकता. मुलांचं उच्च शिक्षण किंवा लग्नासारख्या खर्चांसाठी आधीपासूनच गुंतवणूक सुरू करा.
2 / 8
मुलींबद्दल बोलायचे तर त्यांच्यासाठी सरकारनं एक उत्तम योजना सुरू केली आहे. आम्ही सांगत आहोत सरकारनं सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी (Sukanya Samriddhi Yojana Interest Rate) योजनेबद्दल. सध्या या योजनेत ८ टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
3 / 8
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, पालक आपल्या मुलीचं वय १० वर्षे पूर्ण करण्यापूर्वी तिचं खातं उघडू शकतात. जर एखाद्या गुंतवणूकदारानं आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते (SSY Account) उघडलं, तर तो १५ वर्षांसाठी त्याचे योगदान जमा करू शकतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम काढता येईल.
4 / 8
तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा १२,५०० रुपये जमा केल्यास ही रक्कम एका वर्षात १.५ लाख रुपये होईल. या रकमेवर कोणताही कर लागणार नाही. या योजनेच्या व्याजदरात वेळोवेळी बदल होत असतात. जर आपण मॅच्युरिटीवर ७.६ टक्के व्याजदर घेतला तर तो गुंतवणूकदार आपल्या मुलीसाठी मॅच्युरिटीपर्यंत मोठा फंड तयार करू शकतो.
5 / 8
जर गुंतवणूकदारानं त्याची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम काढली, तर मॅच्युरिटी रक्कम ६३ लाख ७९ हजार ६३४ रुपये होईल. यामध्ये गुंतवणूकदारानं गुंतवलेली रक्कम २२,५०,००० रुपये असेल.
6 / 8
याशिवाय व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न ४१,२९,६३४ रुपये असेल. अशाप्रकारे, तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा १२,५०० रुपये जमा केल्यास, तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तुम्हाला सुमारे ६४ लाख रुपये मिळतील.
7 / 8
गुंतवणूकदार सुकन्या समृद्धी योजनेत एका वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलत मिळवू शकतात. या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतील.
8 / 8
सुकन्या समृद्धी योजना EEE दर्जासह येते. म्हणजे तीन ठिकाणी कर सूट मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत उपलब्ध आहे. या योजनेतून मिळणारे व्याजही करमुक्त आहे. याशिवाय या योजनेतील मॅच्युरिटी रक्कमही करमुक्त आहे.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय