Get a pension of Rs 60,000 by investing Rs 7 per day; Big tax rebates too, find out the details
दररोज 7 रुपये गुंतवून 60 हजार रुपये पेंशन मिळवा; टॅक्समध्येही मोठी सूट, जाणून घ्या डिटेल्स... By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 7:23 PM1 / 7 Atal Pension Yojana: या महागाईच्या युगात प्रत्येकाला वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता आहे. तुम्हालाही तुमचे म्हातारपण सुरक्षित करायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मासिक चांगली पेन्शन मिळू शकते. ही योजना आहे- अटल पेन्शन योजना (APY). चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...2 / 7 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. यापूर्वी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु आता 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. 3 / 7 या योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान मासिक पेन्शन रुपये 1000, 2000, 3000, 4000 आणि कमाल 5,000 मिळू शकतात. ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही नोंदणी करू शकता. यासाठी तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.4 / 7 जाणून घ्या या योजनेचे फायदे- सरकारच्या या योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका फायदा तुम्हाला मिळेल. जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली, तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करताना वेळेची विशेष काळजी घ्यावी लागते.5 / 7 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळेल- या योजनेत तुम्ही दररोज 7 रुपये म्हणजेच महिन्याला 210 रुपये जमा केल्यास तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्ही यामध्ये दरमहा 42 रुपये जमा केले तर तुम्हाला 1000 रुपये मिळतील. 2000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला 84 रुपये गुंतवावे लागतील, 3000 रुपये पेन्शन हवे असेल तर 126 रुपये गुंतवावे लागतील आणि 4000 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला दरमहा 168 रुपये जमा करावे लागतील.6 / 7 कर लाभ- या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणारा कर लाभ आहे. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. यातून करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. म्हणजेच या योजनेत एकूण 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.7 / 7 या योजनेची तरतूद- या योजनेंतर्गत जर एखाद्या गुंतवणूकदाराचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला, तर त्याची पत्नी/पती या योजनेत पैसे जमा करणे सुरू ठेवू शकतात आणि 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन मिळवू शकतात. असाही पर्याय आहे की त्या व्यक्तीची पत्नी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एकरकमी रकमेवर दावा करू शकते. जर पत्नीचाही मृत्यू झाला तर तिच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications