get amazon prime video subscription with these airtel prepaid plans
'KGF-2' अन् 'पंचायत' पाहा एकदम 'Free'; Airtel चे 'हे' Prepaid Plans लयभारी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 3:32 PM1 / 7Amazon Prime सबस्क्रिब्शन अशा लोकांसाठी खूप फायदेशीर ठरतं की जे ई-कॉमस वेबसाइटवरुन बऱ्याच वस्तू मागवतात. कारण यातून वस्तूंवर मोठा डिस्काऊंट मिळवता येतो आणि डिलिव्हरी देखील जलदगतीनं होते. यासोबतच युझर्सना Amazon Prime Video चं देखील सबस्क्रिब्शन मिळतं. 2 / 7Amazon Prime Video देशात खूप लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक बहुचर्चित वेब सीरिज आणि सिनेमे उपलब्ध करुन दिले जातात. गेल्या वर्षी Amazon Prime चं सबस्क्रिब्शन वाढविण्यात आल्यापासून थोडा थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 3 / 7पण Airtel चे असे काही Prepaid Plans आहेत की ज्यामाध्यमातून तुम्ही Amazon Prime चं सबस्क्रिब्शन अगदी मोफत मिळवू शकता. याच प्लान्सबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 4 / 7एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या प्रिपेड प्लानमध्ये युझर्सना रोज २.५ GB डेटा उपलब्ध करुन दिला जातो. याची व्हॅलेटिडी ८४ दिवसांची असते तसंच युझर्सना यात अनलिमिटेड व्हाइस कॉलसोबतच दररोज 100SMS देखील दिले जातात. या प्लानसोबत युझर्स Amazon Prime Membership देखील ८४ दिवसांसाठी कंपनी उपलब्ध करुन देते. 5 / 7Airtel च्या ६९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 3GB हायस्पीड इंटरनेट सोबतच यूझर्सना Amazon Prime चं सबस्क्रिब्शन देखील ५६ दिवसांसाठी दिलं जातं. या प्लानची व्हॅलिटिडी देखील ५६ दिवसांची आहे. यात युझर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि रोज १०० SMS फ्री मिळतात. 6 / 7Airtel च्या ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला 2GB डेटा आणि याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची मिळते. यात अनलिमिटेड कॉल्स आणि दिवसाला 100 SMS देखील मिळतात. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठीचं Amazon Prime मोबाइल एडिशनचं सबस्क्रिब्शन दिलं जातं. 7 / 7एअरटेलचा १०८ रुपयांचा एक अॅड ऑन पॅक आहे. हा पॅक तुम्ही इतर प्रीपेड प्लानसोबत देखील रिचार्ज करू शकता. यात युझर्सना 6GB डेटा मिळतो. यात ३० दिवसांसाठी Amazon Prime Video Mobile Edition चं सबस्क्रिब्शन कंपनीकडून दिलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications