Get back all the home loan interest amount You can invest like this only in SIP
होम लोनच्या व्याजाची सगळी रक्कम परत मिळवाल; फक्त SIP मध्ये अशी करू शकता गुंतवणूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 2:06 PM1 / 8Home Loan : आपलं स्वत:चं घरं असावं अशी सगळ्यांची इच्छा असते. यासाठी अनेकजण बँकांतून होम लोनही घेत असतात. पण, होम लोनचे व्याज मोठ्या प्रमाणात असते. यासाठी अनेकांना आयुष्यभराची बचत द्यावी लागते. 2 / 8तुम्ही जेव्हा होम लोन घेता तेव्हा काही ट्रीक वापरुन बचत केली तर तुमच्या व्याजाची रक्कम जमा होऊ शकते. आपले होम लोन सुरू असते तेव्हा काही ठिकाणी गुंतवणूक करणे महत्वाचे असते.3 / 8जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तुम्हाला नफा नक्की मिळेल. गृहकर्जाच्या व्याजाइतके पैसे सहज परत मिळवण्यासाठी, तुम्हाला योग्य मार्गाने SIP करावी लागेल.4 / 8जर तुम्ही २० वर्षासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल. या कर्जावर तुम्हाला ९ टक्क्यांचे व्याज असेल, दरमहा सुमारे ४५,००० रुपये EMI भरावे लागेल. आता कर्ज संपेपर्यंत, तुम्ही आधीच सुमारे ५८ लाख रुपयांचे व्याज भरले आहे, म्हणजेच तुम्ही मूळ रक्कम आणि व्याजासह एकूण १.०८ कोटी रुपये भरले आहेत.5 / 8ज्यावेळी तुम्ही होम लोन घेता त्यावेळीच तुम्हाला काही रक्कमेचा एसआयपी सुरू करावी लागेल. असं केल्यास तुमचे व्याज कव्हर होऊ शकते.6 / 8जर तुम्ही होम लोनच्या व्याजाच्या १० टक्के SIP केले असते, म्हणजेच तुम्ही SIP मध्ये ४,५०० रुपये गुंतवले असते. जर ही SIP २० वर्षे चालली आणि वार्षिक सरासरी १४ ते १५ टक्के परतावा मिळत असेल, तर २० वर्षांत सुमारे ६५ लाख रुपये तयार होतील.7 / 8६५ लाख रुपयांचा निधी तयार करण्यासाठी, तुम्ही २० वर्षांत सुमारे १२ लाख रुपये गुंतवले असतील आणि उर्वरित ५३ लाख रुपये तुमची व्याजाची कमाई असेल.8 / 8या सारखी गुंतवणूक केल्याने, तुम्हाला होम लोनच्या व्याजाची रक्कम परत मिळेल. यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications