शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:11 AM

1 / 8
काही महिन्यापूर्वी सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. जवळपास २५ टक्के दरवाढ झाली आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलमध्ये सरकारने गुंतवणूक वाढवली आहे.
2 / 8
आता अनेकजण BSNLचे प्लॅन शोधत आहेत. BSNL च्या 1 GB रोजचा डेटा देणारा प्लॅन स्वस्तात आहे. हा प्लॅन Jio च्या तुलनेत अर्ध्या किमतीत येतो. BSNL चा हा प्लॅन जिओ प्रमाणेच वैधता आणि कॉलिंगची सुविधा देत आहे.
3 / 8
BSNL चा हा प्लॅन 52 दिवसांचा आहे. BSNL आपल्या ग्राहकांना 298 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह कॉलिंग आणि डेटा दोन्ही फायदे देत आहे. या प्लॅनची ​​वैधता पूर्ण 2 महिन्यांसाठी उपलब्ध नाही, पण 2 महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनसाठी हा स्वस्त पर्याय असू शकतो.
4 / 8
अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह बीएसएनएलचा हा प्रीपेड प्लॅन 52 दिवसांच्या वैधतेसह येतो.
5 / 8
पॅक स्थानिक आणि STD वर अमर्यादित व्हॉइस कॉल देत आहे. यामध्ये दररोज 1GB डेटा तसेच दररोज 100 SMS ची सुविधा आहे.
6 / 8
या प्लॅनमध्ये Eros Now मनोरंजन सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले आहे. ज्यांना अमर्यादित डेटा आणि दीर्घकाळ कॉलिंग हवे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा आहे.
7 / 8
BSNL चा Rs 797 प्रीपेड रिचार्ज प्लॅन 300 दिवसांची वैधता देते. या प्लानमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये पहिल्या ६० दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.
8 / 8
या कालावधीत तुम्हाला पहिले 60 दिवस अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 2 GB डेटा ऑफर केला जाईल. या कालावधीत वापरकर्त्यांना मोफत एसएमएस सुविधा मिळणार आहे.
टॅग्स :BSNLबीएसएनएल