Get gold cheaply Sovereign Gold Bonds will be open for sale in 2 phases
सोने मिळेल स्वस्तात! सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड २ टप्प्यांत विक्रीसाठी खुले होणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:21 AM1 / 9गुंतवणुकीसाठी सोने हा आजही सर्वांत खात्रीशीर पर्याय आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक सोनेखरेदीवर भर देतात. सणासुदीचा हंगाम किंवा दर खाली येताच लोक काही प्रमाणात का असेना, सोन्याची खरेदी करतात; परंतु गोल्ड बॉण्डच्या रूपात स्वस्तात सोनेखरेदीची संधी लोकांना पुन्हा मिळणार आहे. 2 / 9केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून चालू डिसेंबर तसेच फ्रेबुवारीमध्ये गोल्ड बॉण्डमध्ये (एसजीबी) गुंतवणूक योजनेची संधी गुंतवणूकदारांना देणार आहे. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. 3 / 9सॉव्हरिन गोल्ड बॉण्डची किंमत इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडकडून अखेरच्या तीन दिवसांतील सोन्याच्या सरासरी किमतीच्या आधारे निश्चित केली जाते.4 / 9सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड हा एक सरकारी बॉण्ड असतो. प्रत्येक बॉण्डची इश्श्यू प्राईस ९९९ कॅरेट सोन्याच्या भावानुसार ठरविली जाते. ऑनलाइन खरेदी केल्यास यावर प्रत्येक बॉण्डमागे ५० रुपयांची सूट दिली जाते. त्यामुळे राज्याराज्यांमध्ये हे बॉण्ड सोन्याच्या सध्याच्या किमतीपेक्षा काही रुपयांनी स्वस्तात मिळतात.5 / 9तिसरा टप्पा : १८ ते २२ डिसेंबर चौथा टप्पा : १२ ते १६ फेब्रुवारी6 / 9सुरुवात २०१५ मध्ये, मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सॉव्हरिन गोल्ड बॉण्डचा तिसरा टप्पा १८-२२ डिसेंबरदरम्यान सुरू होईल.7 / 9चौथा टप्पा १२-१६ फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार आहे. पहिला टप्पा १३ ते २३ जूनदरम्यान सुरू केला तर दुसरा ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान खुला केला होता. 8 / 9सर्वांत पहिल्यांदा या बॉण्डची विक्री नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली होती.9 / 9या योजनेतून गुंतवणुकीची कमाल मर्यादा ४ किलो इतकी निश्चित केली आहे. यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येणार नाही. गुंतवलेली रक्कम ८ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर परत मिळेल. ५ वर्षांनंतर बॉण्डमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications