शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीत 'घरच्या लक्ष्मी'ला द्या हे फायनान्शिअल गिफ्ट, भविष्य होईल सुरक्षित; अविस्मरणीय होईल सण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 9:13 AM

1 / 7
Diwali Financial Gifts: आज म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीपासून दीपावलीच्या सणाला सुरुवात झाली. १२ नोव्हेंबरला लक्ष्मी पूजन आणि दीपावली आणि १५ नोव्हेंबरला भाऊबीज आहे. दिवाळी हा मोठा सण मानला जातो. दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी माता लक्ष्मी प्रकट झाली होती.
2 / 7
या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबावर लक्ष्मीची कृपा कायम राहते, असं म्हटलं जातं. दिवाळीच्या सणाला भेटवस्तू देण्याचाही ट्रेंड आहे. सहसा लोक दिवाळीला नातेवाईक, परिचित आणि मित्रांना भेटवस्तू देतात.
3 / 7
पण यावेळी तुम्ही तुमच्या 'घरातील लक्ष्मी' म्हणजेच मुलीला (Financial Gifts on Diwali) आर्थिक भेटवस्तू द्या. यामुळे तिचं भविष्य सुरक्षित होईल आणि दिवाळीचा हा सण कायम संस्मरणीय राहील.
4 / 7
एफडी - दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला बोनसचे पैसे मिळत असतील. जे तुम्ही इकडे-तिकडे खर्च करता. पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या पैशाचा योग्य वापर करून तुमच्या मुलीच्या नावावर फिक्स करुन घेऊ शकता. जर हे पैसे तुम्हाला कमी वाटत असतील तर तुम्ही त्यात थोडे पैसे जोडून तुमच्या मुलीच्या नावावर एफडी करू शकता. हे पैसे मुलीलाही उपयोगी पडतील आणि तिला ही भेट खूप आवडेल.
5 / 7
ज्वेलरी - धनत्रयोदशीच्या निमित्तानं लोक अनेकदा खरेदी करतात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होते. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा पत्नीसाठी सोन्याची अंगठी, चेन किंवा इतर कोणतेही दागिने खरेदी करू शकता आणि दिवाळीला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचे अँकलेट वगैरे खरेदी करून देऊ शकता. या अशा गोष्टी आहेत ज्यांचा त्यांना खूप उपयोग होईल आणि काळाबरोबर त्यांचे मूल्यही वाढेल.
6 / 7
डिजिटल गोल्ड - तुम्हाला भौतिक सोने खरेदी करायचं नसेल तर तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. अनेक मोबाईल ई-वॉलेट, ब्रोकरेज कंपन्या आणि मोठ्या ज्वेलर्स कंपन्यांसह वित्तीय संस्था देखील डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय देतात. डिजिटल सोन्याची किंमत देखील भौतिक सोन्याच्या बाजारभावाच्या आधारावर ठरवली जाते. तुम्ही शुद्ध २४ कॅरेट सोन्यातही गुंतवणूक करू शकता. त्यावर तुम्हाला मेकिंग चार्जेस किंवा कोणत्याही प्रकारचे स्टोरेज शुल्क भरावं लागणार नाही. तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही एक चांगली भेट आहे.
7 / 7
एसआयपी - आजकाल SIP चा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामध्ये खूप चांगले रिटर्न मिळतात असं तज्ज्ञांचं मत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा पत्नीसाठी एसआयपी सुरू करू शकता. दीर्घकालीन एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा परिस्थितीत, याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली रक्कम जोडू शकता आणि तिचं भविष्य सुरक्षित करू शकता.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा