शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांना पॉकेटमनी देताय? मग त्यांचे बॅंक खातेही काढा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 2:12 PM

1 / 5
आर्थिक शिस्तीसाठी बचतीची सवय लहानपणापासूनच लावायला हवी. त्यासाठी मुलांचे बँक खाते उघडणे आवश्यक आहे. सामान्यपणे लोक मुलांसाठी बँक खाती उघडत नाहीत. मात्र, खाते उघडून मुलांमध्ये बचतीची सवय तुम्ही लावू शकता.
2 / 5
मायनर खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खाते उघडण्यासारखी आहे. खाते उघडण्यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पालकांचे केवायसी लागते.
3 / 5
शिष्यवृत्तीची रक्कम, प्रोत्साहन म्हणून दिलेली रक्कम किंवा मुलांशी संबंधित कोणत्याही योजनेची रक्कम थेट त्यांच्या अल्पवयीन खात्यात जमा केली जाऊ शकते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीनांसाठी हे खाते उघडले जाते.
4 / 5
फक्त पॉकेटमनी देण्यापेक्षा मुलांना साध्या घरगुती कामातून पैसे कमवण्याची संधी द्या. जेणेकरून त्यांना पैशाची किंमत समजण्यास मदत होईल. त्यासाठी खोलीची साफसफाई किंवा इतर कामाच्या बदल्यात थोडेफार पैसे मिळाल्याने त्यांना त्यांच्या पैशांची किंमत कळण्यास मदत होईल. कष्टाने पैसा मिळविला जातो हे त्यामुळे त्यांना कळेल.
5 / 5
पालकांचा अचानक मृत्यू झाल्यास एक लाख रुपयांचा मोफत शिक्षण विमा मिळतो. पालकांच्या परवानगीने एटीएम सुविधा. नेटबँकिंग सुविधा मोफत मिळते. तुम्ही तुमच्या मुलाचे खाते घरी बसून ट्रॅक करू शकता.
टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय