gold and silver fresh price today gold became more cheaper check latest rates
Gold-Silver Price Today : अशी संधी पुन्हा नाही! सोन्याच्या दरात मोठी घसरण, फटाफट चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:43 PM1 / 11Gold-Silver Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरू होती. पण, आता सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2 / 11आज आठवड्याच्या सुरुवातीलाच एमसीएक्सवर सोमवारी सकाळी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली. 3 / 11Gold-Silver Price Today : सोन्याचे दर घसरुन ५८ हजार रुपयांवर पोहोचले आहे. MCX वर सोन्याचे दर १०४ रुपयांच्या घसरणीसह ५८७३९ रुपयांवर उघडले.4 / 11एमसीएक्स एक्सचेंजवर चांदी १३० रुपयांच्या घसरणीसह ७१२८४ रुपयांवर उघडली. मात्र, काही वेळानंतरही सोन्याचा दर ५८७३९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या वाढीसह व्यवहार करत आहे.5 / 11 सोमवारी सकाळी एमसीएक्सवर सोने १०२ रुपयांच्या घसरणीसह ५८७३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. दरम्यान, ५८६६० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आणि सकाळी ९.३० वाजेपर्यंत प्रति १० ग्रॅम ५८७३९ रुपयांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. 6 / 11Gold-Silver Price Today : जागतिक पातळीवरही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा बाजार ५९१२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.7 / 11Gold-Silver Price Today : सोमवारी एमसीएक्सवर सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोमवारी एमसीएक्स एक्सचेंजवर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता चांदीचा भाव ११९ रुपयांनी घसरून ७१२८४ रुपये प्रति किलो झाला. चांदीचा दरही व्यापार सत्रात ७१२८४ रुपये प्रति किलोवर पोहोचला. 8 / 11शुक्रवार, ५ डिसेंबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत प्रति किलो ७२७०० रुपये बंद झाली आहे.9 / 11Gold-Silver Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी, US Comex वर सोने ०.२५ टक्क्यांनी (४.७५ डॉलर) कमी होऊन १,९२७.२५ डॉलर प्रति औंस वर व्यापार करत होते. 10 / 11US Comex वर ०.२३% म्हणजेच ०.०५ डॉलरच्या घसरणीनंतर चांदी २३.२३ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.11 / 11सोन्या-चांदीचे दर तुम्ही घरी बसूनही जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉलच्या बर्याच काळानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवरील संदेशाद्वारे सोन्या-चांदीचे नवीनतम दर मिळतील. आणखी वाचा Subscribe to Notifications