शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Update : गोड बातमी! अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी झालं स्वस्त, फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 4:11 PM

1 / 9
अक्षय तृतीयाच्या अगोदर सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे, गेल्या काही सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे.
2 / 9
Gold Price Update : जर तुम्ही अलीकडच्या काळात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या दरानुसार तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. अक्षय तृतीयाच्या एक दिवस आधी सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीतही मोठी घसरण दिसून आली.
3 / 9
पण, आगामी काळात सोन्या-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सोनं-चांदी खरेदी करायच्या असल्यास ही संधी सोडू नका.
4 / 9
Gold Price Update : फेब्रुवारी महिन्यातही सोन्या-चांदीचे दर खाली आले होते. मात्र त्यानंतर दरवाढीने नवे विक्रम केले. येत्या काळात सोन्याचा भाव ६५,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
5 / 9
गुरुवारी सोन्या-चांदीत वाढ दिसून आली. मात्र आज पुन्हा त्यात तेजी पाहायला मिळत आहे.
6 / 9
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर घसरले. एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव ४९५ रुपयांनी घसरून ६०००८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ५३१ रुपयांनी घसरून ७४९७० रुपये प्रति किलो झाला.
7 / 9
यापूर्वी गुरुवारी सोन्याचा भाव ६०५०३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७५५०१ रुपयांवर बंद झाली होती.
8 / 9
इंडिया बुलियन्स असोसिएशन (https://ibjarates.com) द्वारे सराफा बाजार दर दररोज जारी केले जातात. शुक्रवारी २४ कॅरेट सोने ६०४४६ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर घसरले.
9 / 9
Gold Price Update : चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आणि चांदी ७४७६३ च्या पातळीवर पोहोचला. शुक्रवारी २३ कॅरेट सोन्याचा भाव ६०२०४ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर ५५३६९ रुपये आणि २० कॅरेट सोन्याचा दर ४५३३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकSilverचांदी