gold and silver price each on record high mcx gold price on 13th april 2023
Gold Price Today: सोन्याची चमक पुन्हा वाढली! फटाफट चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:36 AM1 / 9Gold-Silver Price Today: दिपावली पर्यंत सोनं ६५ हजारापर्यंतो पोहचू शकत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 2 / 9गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली होती. 3 / 9मात्र त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ६५,००० रुपये आणि चांदी ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या चांदी ७६, ००० रुपयांवर पोहोचली आहे.4 / 9सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बुधवारी सायंकाळी सोन्याचा भाव ६०६१३ रुपये आणि चांदीचा भाव ७४९४० रुपये किलो झाला. 5 / 9बुधवारी संध्याकाळी इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०६१३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ७४९४० रुपये प्रति किलो झाला आहे.6 / 9याशिवाय २३ कॅरेट सोन्याचा भाव ६०३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५५२२ रुपये, २० कॅरेट सोन्याचा भाव ४५४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.7 / 9आज दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,३५० रुपयांवर आहे. मुंबईत आज १० ग्रॅम सोन्याचा दर५६,१०० रुपयांवर आला आहे.8 / 9आज कोलकातामध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर५६,१०० रुपयांवर आला आहे. चेन्नईमध्ये आज १० ग्रॅम सोन्याचा दर ५६,७६० रुपयांवर आला आहे.9 / 9भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक मागणी देखील मौल्यवान धातूंच्या दरामध्ये दिसून येणारा ट्रेंड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आणखी वाचा Subscribe to Notifications