शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठी घसरण! सोने तब्बल १ हजार अन् चांदी २ हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 12:25 PM

1 / 10
कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीला नफावसुलीचा मोठा फटका बसला आहे. चौफेर विक्रीने सोन्याचा भाव तब्बल ९५२ रुपयांनी गडगडला आणि ४७ हजार ७०० रुपयांच्या पातळीखाली घसरले आहे.
2 / 10
मागील महिन्याभरात सोन्यात झालेली ही मोठी घसरण आहे. सराफा बाजारात सोने १ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने ४६ हजार ६५१ रुपयांवर स्थिरावले. त्यात ९५२ रुपयांची घसरण नोंदवली गेली.
3 / 10
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव तब्बल २ हजार रुपयांनी स्वस्त झाला असून तो ६५ हजारांखाली आला आहे. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६४ हजार ९७५ रुपयांवर स्थिरावला. त्यात शुक्रवरच्या सत्रात २ हजार ०२३ रुपयांची घसरण झाली.
4 / 10
शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली घसरला. त्यात शुक्रवारच्या तुलनेत १ हजार रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटचा भाव ४७ हजार ७० रुपये झाला आहे.
5 / 10
दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५ हजार ७५० रुपये इतका खाली आला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९ हजार ९०० रुपये आहे. त्यात तब्बल १ हजार १०० रुपयांची घसरण झाली आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४ हजार ४०० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ४४० रुपये आहे. त्यात ६६० रुपयांची घसरण झाली.
6 / 10
कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ५०० रुपये असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार रुपये आहे. स्पॉट गोल्डचा भाव ४२.७२ डॉलरने कमी झाला आणि तो १७६१.८५ डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव ३.४३ डॉलरने घसरला आणि तो २४. २९ डॉलर इतका झाला आहे.
7 / 10
गेल्या वर्षी कोरोना काळात मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीत वर्षभरात तब्बल ८ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी ५७ हजार २०० रुपयांवर सोन्याचा दर गेला होता. तर चांदीचा दर ७७ हजार ५०० रुपयांवर गेला होता.
8 / 10
रशियाने कोरोना प्रतिबंधक लस आल्याचे जाहीर केल्यानंतर १२ ऑगस्ट २०२० रोजी एकाच दिवसात सोने ४ हजार, तर चांदीत १२ हजारांची घसरण झाली. त्यानंतर चढ-उतार सुरुच राहिल्याचे पाहायला मिळाले.
9 / 10
सध्या सोने-चांदीचे भाव कमी झाले असून, या काळात गुंतवणूक करण्यात संधी असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनामुळे सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असून, दिवाळीपर्यंत या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा वाढ होऊन सोने ५२ हजार, तर चांदी ७५ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
10 / 10
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. १०० वर्षांपूर्वी लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
टॅग्स :businessव्यवसायGoldसोनंSilverचांदी