शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate Today : आज सोन्या-चांदीचा दर पुन्हा धडाम...! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 2:44 PM

1 / 7
सर्राफा बाजारांत आज पुन्हा एकदा सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. मात्र ही घसरण फार कमी आहे. सोने 132 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 71869 रुपयांवर कुले झाले, तर चांदी केवळ 26 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 85046 रुपयांवर आली आहे.
2 / 7
सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज्स लावण्यात आलेले नाहीत. आपल्या शहरानुसार यात 1000 ते 2000 रुपयांचा फरक पडू शखतो.
3 / 7
14 ते 23 कॅरेट सोन्याचा दर - आज 23 कॅरेट सोन्याचा दर 132 रुपयांनी स्वस्त होऊन ₹71581 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 121 रुपयांनी कमी होऊन ₹65832 वर आला आहे.
4 / 7
याशिवाय, 18 कॅरेट सोन्याचा विचार करता, हा भाव ₹53902 वर आहे. यात 99 रुपयांची घसरण दिसून आली आहे. तसेच 14 कॅरेट सोन्याच्या दरातही आज 78 रुपयांची घसरण झाली असून तो घसरून 42043 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. सोन्याच्या या दरावर अद्याप जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नाही.
5 / 7
जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर - जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 74025 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा दर 73728 रुपये आहे. यात 3 टक्के जीएसटीच्या हिशेबाने 2147 रुपये जोडण्यात आले आहेत.
6 / 7
22 कॅरेट सोन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, आज जीएसटीसह हा दर 67806 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय, 18 कॅरेट सोन्याचा दर 1617 रुपयांच्या जीएसटीसह 55519 रुपये जाला आहे.
7 / 7
यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा लावण्यात आलेला नाही. तसेच, जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 87597 रुपये झाला आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीInvestmentगुंतवणूक