मोठी बातमी! सोन्याच्या किमती लवकरच घसरणार, आयात कर थेट ४ टक्क्यांवर आणण्याची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 2:19 PM
1 / 8 सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार वाणिज्य मंत्रालयानं आयात करात घट करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोन्याच्या आयातीवरील कर ७.५ टक्क्यांवरुन ४ टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 2 / 8 आयात करात घट केल्यानं सोन्याच्या किमतीत देखील घसरण होण्याची शक्यता आहे. एकाच फटक्यात सोन्याच्या किमतीत ३.५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. 3 / 8 केंद्र सरकारनं वाणिज्य मंत्रालयानं केलेली शिफारस मान्य केली तर याचा थेट परिणाम सोन्याची तस्करी रोखण्यासाठी होऊ शकतो. सरकारनं याआधीच्या बजेटमध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करात कपात केली होती. आयात कर १२.५ टक्क्यांवरुन ७.५ टक्के करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा घट करत ७.५ टक्क्यांवरुन आयात कर ४ टक्के करण्याचा मानस आहे. 4 / 8 तज्ज्ञांच्या माहितीनुसार आयात करात कपात केल्यामुळे सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे. एका झटक्यात सोन्याच्या दरात ३.५ टक्क्यांची घट होऊ शकते. याशिवाय सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनाही मोठा फायदा होईल. 5 / 8 सोन्याच्या तस्करीला देखील आळा बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच सरकारचं हे पाऊल बुलियन इंडस्ट्री आणि गुंतवणुकदारांसाठी एक सर्वोत्तम निर्णय ठरेल असं म्हटलं जात आहे. 6 / 8 वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या ताज्या अहवालानुसार या तिमाहीत सण-उत्सव आणि लग्नाच्या सीझनमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याची मागणीची आकडेवारी गेल्या १० वर्षांचे रेकॉर्ड मोडीस काढेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 7 / 8 देशात सोन्याची जितकी विक्री होते त्यातील बहुंताश वाटा भारताला परदेशातून आयात करावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. यंदा तर गेल्या १० वर्षांमधला सोनं आयातीचा रेकॉर्ड मोडीस निघेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 8 / 8 जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या भारतात सोन्याची मागणी प्रमुख स्वरुपात सराफा आणि अशुद्ध सोन्याच्या आयातीवर अवलंबून आहे, असं डब्ल्यूजीसीचे सीईओ सोमासुंदरम पीआर यांनी म्हटलं. २०२२ साली सोन्याची आयात यंदाच्या वर्षापेक्षाही अधिक असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आणखी वाचा