शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोल्ड लोन सर्वात स्वस्त अन् सोपेही!; कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर एकदा वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 8:29 AM

1 / 9
आर्थिक संकटाच्या काळात रोख रकमेची गरज भागविण्यासाठी सोने तारण कर्ज आधार बनू शकते. विशेष म्हणजे सोने तारण कर्ज हे वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) आणि मुदत कर्जाच्या (टर्म लोन) तुलनेत स्वस्त पडते तसेच ते मिळविणे सुलभ आहे.
2 / 9
रिजर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी सोने तारण ठेवून घेण्यात येणाऱ्या कर्जात ६६.२ टक्के वाढ झाली.
3 / 9
एकूण ६८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने तारण कर्ज वितरित करण्यात आले. बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) या प्रामुख्याने सोने तारण कर्ज देतात.
4 / 9
सोन्यावरील कर्जाद्वारे गरजवंतास लगेच रोख रक्कम उपलब्ध होते. ‘अँड्रोमेडा’ आणि ‘अपना पैसा’चे सीईओ व्ही. स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे दस्तावेज व कागदोपत्री कारवाई यांच्याशिवाय सोने तारण कर्ज मिळू शकते.
5 / 9
कर्जदारास उत्पन्नाचा कोणताही पुरावा द्यावा लागत नाही. कर्जाची रक्कमही लगेचच दिली जाते. वैयक्तिक कर्ज व अन्य संपत्ती गहाण ठेवून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी वेळ लागतो.
6 / 9
‘बँक बाजार’चे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले की, हे संपत्ती तारण ठेवून दिले जाणारे कर्ज आहे. त्यामुळे ते वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डापेक्षा स्वस्त पडते. याचा आणखी एक फायदा असा आहे की, यासाठी क्रेडिट स्कोअरची गरज नसते. ‘लो क्रेडिट प्रोफाईल’ असलेल्या लोकांनाही सोने तारण कर्ज मिळू शकते.
7 / 9
सोने तारण कर्जात मोठी नकारात्मक बाब एकच आहे की, कर्जाची परतफेड न करता आल्यास कर्जदार सोने गमावू शकतो.
8 / 9
बँका आणि एनबीएफसी या दोन्ही प्रकारचे कर्जदाते तारण सोन्याच्या किमतीच्या ७५ टक्केच कर्ज देऊ शकतात.
9 / 9
कर्जाची परतफेड करण्याची जास्तीत जास्त मुदत २४ महिने आहे. इतर कर्जांच्या तुलनेत ही मुदत फारच कमी आहे. वैयक्तिक कर्जाची परतफेड मुदत ६० ते ७२ महिने इतकी असते.
टॅग्स :Goldसोनं