शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लवकरच भारतात सुरू होणार सोन्याची आणखी एक खाण; पहिल्यांदाच खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 9:23 PM

1 / 6
Gold Mines in India: जगातील मौल्यवान धातूंमध्ये सोन्याची गणना केली जाते. ज्या देशांमध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारतात आवश्यक असलेले बहुतांश सोने आयात केले जाते. पण, आता लवकरच सोन्याची आयात कमी होऊ शकते. पुढील वर्षापासून देशातील मोठ्या खासगी सोन्याच्या खाणीतून सोने बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे.
2 / 6
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील तुग्गली मंडलम येथे जोनागिरी नावाची सोन्याची खासगी खाण आहे. ही खाण जिओमिसोर सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड विकसित करत आहे. या खाणीला 2013 साली मान्यता मिळाली होती. त्या भागात सोन्याचा शोध घेण्यासाठी कंपनीला 8-10 वर्षे लागली.
3 / 6
जिओमिसोर सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडमध्ये डेक्कन गोल्ड माईन्सचा सुमारे 40 टक्के हिस्सा आहे. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड, ही देशातील पहिली आणि आतापर्यंतची एकमेव सोने शोधणारी कंपनी आहे, जी BSE वर सूचीबद्ध आहे. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेडच्या देशाबाहेरही सोन्याच्या खाणी आहेत. किर्गिझस्तानमधील सोन्याच्या खाणीच्या प्रकल्पात कंपनीचा 60 टक्के हिस्सा आहे.
4 / 6
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील पहिल्या मोठ्या खाजगी सोन्याच्या खाणीत पुढील वर्षी उत्पादन सुरू होऊ शकते. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक हनुमा प्रसाद यांनी सांगितले की, जोनागिरी गोल्ड प्रकल्पातील उत्पादन पुढील वर्षाच्या अखेरीस, म्हणजे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
5 / 6
प्रसाद यांनी सांगितले की, जोनागिरी गोल्ड प्रोजेक्टमध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 750 किलो सोन्याचे उत्पादन होईल. खाणीत आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सध्या येथे प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू असून दर महिन्याला सुमारे एक किलो सोने काढले जाते.
6 / 6
भारतात दरवर्षी सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्पादन होते. देशातील सर्वाधिक सोन्याचा साठा कर्नाटकात आहे. राज्यातील कोलार, एहुटी आणि उटी येथील खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. कर्नाटकात 88 सोन्याचा साठा आहे. याशिवाय 12 टक्के सोन्याचा साठा आंध्र प्रदेशात, तर काही साठा झारखंडमध्ये आहे.
टॅग्स :GoldसोनंAndhra Pradeshआंध्र प्रदेश