शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोन्याचा दरात पुन्हा मोठी वाढ होणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 11:50 AM

1 / 9
देशात गेल्या वर्षभरात कोरोना काळात सोन्याच्या किंमतींमध्ये नवीन विक्रम नोंदवला गेला होता. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर सोन्याची किंमत हळहळू कमी झाल्या होत्या.
2 / 9
यंदाच्या वर्षात पाहायचं झालं तर सोन्याच्या किमती ५० हजारापर्यंत आल्या आहेत. एप्रिल महिन्यात सोनं हे ३ ते ४ हजारांनी महागलं आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार २०२१ च्या अखेरीस जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमतीत प्रतिऔंस २०६३ डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
3 / 9
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या (BoFA माहितीनुसार, कोरोना काळात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किंमतीतील वाढ अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
4 / 9
BoFA नं वर्तवलेल्या अंदाजानुसार पाहायचं झाल्यास भारतात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ५३ हजारापर्यंत जाऊ शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ भारतालाच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5 / 9
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सोन्याच्या दरात घट होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण मार्च २०२१ पासून पुन्हा एकदा सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या 31 मे रोजी सोन्याची किंमत ही 1907.59 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली होती. ही किंमत 10 महिन्यातील उच्चांकी दर होता.
6 / 9
गुंतवणुक मार्गदर्शकांच्या म्हणण्यानुसार सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच मोठी नामी संधी आहे. कारण येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. डिसेंबरपर्यंत सोन्याची प्रति १० ग्रॅमची किंमत ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
7 / 9
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष ( रिसर्च) अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार देशात दिवाळी सणापर्यंत सोन्याचा भाव ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे लाँग टर्म गुंतवणुकीसाठी सोन्यात गुंतवणूक करणं चांगला पर्याय ठरू शकतो.
8 / 9
एप्रिल महिन्याचा अंदाज लावायचा झाला तर भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये 3000 रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात ही किंमत आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
9 / 9
देशात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅमसाठी ४७ हजार १२० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅमसाठी ५१ हजार २७० रुपये इतका आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी