Gold price: Did gold rise or fall compared to last week? Know the market price
Gold Rate: गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने वाढले की घसरले? जाणून घ्या बाजारभाव By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 3:11 PM1 / 10कोरोना लसीच्या येण्यामुळे काही काळ कमी झालेले सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह चार-पाच देशांमध्ये कोरोना लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. भारतातही ती लवकरच दिली जाणार आहे. या घडामोडी याच आठवड्यातील असल्या तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली नाही. 2 / 10उलट शुक्रवारी वायदा बाजारात फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोने 213 रुपयांनी वाढले आहे. गुरुवारी हे सोने प्रति तोळा 49077 रुपयांवर बंद झाले होते. तर शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 49290 वर बंद झाले आहे. 3 / 10याचप्रकारे एप्रिलच्या डिलिव्हरीचे सोने 177 रुपयांनी वाढून 49330 रुपयांवर बंद झाले. मार्च डिलिव्हरीची चांदीदेखील 70 रुपयांच्या वाढीने 63600 रुपये प्रति किलो दरावर बंद झाली. 4 / 10दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोने 102 रुपयांच्या घसरणीमुळे 48,594 रुपये प्रति 10 ग्राम झाले आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात हे सोने 48,696 रुपये प्रति 10 ग्रामवर बंद झाले होते. 5 / 10गेल्या आठवड्याचा दर पाहता या आठवड्यात सोने 102 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी गेल्या आठवड्यापेक्षा फक्त ६ रुपयांनी घसरली आहे. 6 / 10आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी क्रमश: 1,836 डॉलर प्रति औंस आणि 23.92 डॉलर प्रति औंसवर राहिली आहे. 7 / 10ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या दराची तुलना शुक्रवारच्या दराशी केल्यास सोन्याच्या दरात 6964 रुपयांची घसरण झाली आहे. 8 / 10याचप्रकारे ऑगस्टमध्ये चांदी 76008 रुपये प्रति किलो झाली होती. शुक्रवारच्या दराशी तुलना केल्यास 12408 रुपयांनी चांदी कमी झाली आहे. 9 / 10संकटाच्या काळात सोन्यानेच नेहमी तारले आहे. 1979 मध्ये अनेक युद्धे झाली. याकाळात सोन्यामध्ये 120 टक्क्यांची वाढ झाली होती. 2014 मध्ये सीरियावर अमेरिकेच्या हल्ल्याचा धोका होता. तेव्हाही सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली होती. 10 / 10जेव्हा इराण, चीनविरोधात अमेरिकेचा तणाव वाढू लागला तेव्हाही सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ लागली होती. त्यानंतर कोरोना आल्याने तर सोन्याने दीडपटीहून अधिक मोठी उसळी घेतली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications