शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Hike : सोन्याची दरवाढ, तर चांदीची चमक झाली कमी; पाहा काय आहेत नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:45 PM

1 / 10
सध्या अनेक कारणांमुळे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी हे दर मात्र ऑल टाईम हाय पेक्षा जवळपास साडेदहा हजार रूपयांनी कमीच आहेत.
2 / 10
मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात विरोधाभास पाहायला मिळाला. सोन्याच्या दरात वाढ झाली. तर चांदीच्या दरात घसरण झाली.
3 / 10
दिल्लीत सोन्याच्या दरात ११६ रूपयांची वाढ होऊन ते ४४ हजार ३७४ रूपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले. तर चांदीच्या दरात ११७ रूपयांची घसरण होऊन ती ६५ हजार २९९ रूपयांवर पोहोचली.
4 / 10
जागतिक बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्याची किंमत वाढत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
5 / 10
यापूर्वी कामकाजाच्या सत्रात सोन्याचे दर ४४ हजार २५८ रूपये प्रति १० ग्रामच्या स्तरावर होते. चक चांदीचे दर ६५ हजार ४१६ रूपये प्रति किलोच्या दरावर होते.
6 / 10
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ११६ रूपयांनी वाढला आहे. याचं मुख्य कारण जागतीक बाजारात तेजीही आहे, असं मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांनी व्यक्त केलं.
7 / 10
डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत होता. तरीही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली.
8 / 10
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १,७३८ डॉलर्स प्रति औंस आणि चांदीचे दर २५.५३ डॉलर्स प्रति औंस इतके होते.
9 / 10
सोन्याचा वायदा भाव मंगळवारी ०.१९ टक्क्यांनी घसरून ४४ हजार ८१९ रूपये प्रति १० ग्राम झाला.
10 / 10
एमसीएक्सवर ७,८०६ लॉट्सच्या बिझनेस टर्नओव्हरवर एप्रिल महिन्यात दिल्या जाणाऱ्या सोन्याचे दर ८६ रूपयांनी घसरून ४४ हजार ८१९ रूपये प्रति १० ग्राम झाले.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMONEYपैसाMarketबाजारdelhiदिल्ली