शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Rate : सणासुदीच्या काळात सोनं-चांदी देणार धक्का! सोन्याच्या दराने ६१,००० पार केले तर चांदीच्या दरातही तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:44 PM

1 / 11
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने अनेकजण सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
2 / 11
आज सोन्याचा भाव ६१,००० च्या वर व्यवहार करत आहे. फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने ६०,९१५ रुपयांच्या पातळीवर उघडले.
3 / 11
यानंतर, सकाळी १०.१५ पर्यंत तो ६१,०२४ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे, कालच्या तुलनेत ७२ रुपयांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी महाग झाला आहे. गुरुवारी सोनं ६०,९५२ रुपयांवर बंद झाला.
4 / 11
शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या किंमती वाढल्या. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी ७१,७४५ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडली.
5 / 11
यानंतर, १०.१५ मिनिटांपर्यंत चांदीमध्ये आणखी वाढ नोंदवली आणि कालच्या तुलनेत २८७ रुपयांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी महाग झाली आणि ७१,८६७ रुपयांच्या पातळीवर राहिली. काल वायदे बाजारात चांदी ७१,५८० रुपये प्रति किलोवर बंद झाली.
6 / 11
नवी दिल्ली- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
7 / 11
मुंबईत- २४ कॅरेट सोने ६१,९६० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने ६१,९६० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
8 / 11
चेन्नई- २४ कॅरेट सोने ६२,२५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७७,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे. पुणे- २४ कॅरेट सोने ६१,९६० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. जयपूर- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये किलो दराने विकली जात आहे.
9 / 11
लखनौ- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. पाटणा- २४ कॅरेट सोने ६२,०१० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये किलो दराने विकली जात आहे.
10 / 11
गाझियाबाद- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. गुरुग्राम- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. नोएडा- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,६०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
11 / 11
देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, सोने आज ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह १,९८८.८० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. चांदी कालच्या तुलनेत ०.५९ टक्क्यांनी महाग झाले आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी