शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today: आज ५ महिन्यांच्या निचांकी स्तरावर पोहोचला सोन्याचा भाव, पटापट जाणून घ्या लेटेस्ट दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 3:32 PM

1 / 9
सोन्याच्या दरात आज बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
2 / 9
मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबरसाठीचा सोन्याच्या वायदा दरात ०.०३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली असून प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ४६,०६० रुपयांवर ट्रेंड करत आहे.
3 / 9
दुसरीकडे चांदीच्या दरात किंचिंत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. डिसेंबरसाठीच्या वायदा दरात चांदीचा भाव ०.३७ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ६१ हजार ३०६ रुपयांवर ट्रेंड होत आहे.
4 / 9
गेल्या सत्रात सोन्याच्या दरात १.७ टक्क्यांची मोठी घट झाली होती. जवळपास ८०७ रुपयांनी सोन्याचा दर कमी झाला होता. एकूणच गेल्या तीन दिवसांत सोन्याचा दर एकूण मिळून १२०० रुपयांनी घट झाली आहे.
5 / 9
गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. गेल्या तीन दिवसांत चांदीच्या दरात प्रतिकिलो मागे २१५० रुपयांची घट झाली आहे. जवळपास ३.५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
6 / 9
जागतिक बाजारात सातत्यानं घट नोंदविण्यात येत असताना सोन्याची किंमत १,७५४.८६ डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे. शुक्रवारी आशियाई बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात निराशाजनक सुरुवात झाली.
7 / 9
आज सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४६ हजार ८८ रुपये इतका होता. तर चांदीचा दर प्रतिकिलोसाठी ६१ हजार १९२ रुपये इतका नोंदविण्यात आला होता.
8 / 9
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाला आलेल्या बळकटीचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झालेला पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजार सोनं ४९१ रुपयांनी स्वस्त झालं होतं. तर चांदी प्रतिकिलोमागे ७२४ रुपयांनी स्वस्त झालं होतं.
9 / 9
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार प्रत्येक शहरात ज्वेलरी असोसिएशन आहेत. दररोज सकाळी सोन्याचा दर असोसिएशनकडून जारी केला जातो. त्यामुळेच विविध शहरांमध्ये सोन्याचा दर वेगवेगळा पाहायला मिळतो.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीshare marketशेअर बाजारbusinessव्यवसाय