शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, MCX वर सोन्या-चांदीचा दर वधारला, पाहा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:38 PM

1 / 6
Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ७५ हजारांच्या पुढे गेलाय. भारतीय वायदा बाजारातही सोनं ७४,३०० च्या वर मोठ्या तेजीसह व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीतही चमक दिसू लागलीये.
2 / 6
एकंदरीत सराफा बाजारात मोठी तेजी दिसून येतेय. आज एमसीएक्सवर सोनं २५३ रुपयांनी (०.३४%) वाढून ७४,३९० रुपये प्रति १० ग्रॅम झालंय. मागील सत्रात तो ७४,१३७ रुपयांवर बंद झाला होता. तर, चांदी ३८० रुपयांनी (०.४१%) वधारून ९२,३२२ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. मागील सत्रात चांदी ९१,९४२ वर बंद झाली.
3 / 6
सप्टेंबरमध्ये अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली असून, त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. स्पॉट गोल्ड ०.१ टक्क्यांनी वधारून २,४६१ डॉलर प्रति औंस झालंय.
4 / 6
बुधवारी सोन्यानं २,४८३ डॉलर्सचा उच्चांक गाठला. तर अमेरिकन सोन्याचा वायदा ०.२ टक्क्यांनी वधारून २,४६५ डॉलर्सवर पोहोचला. व्याजदरात कपात आणि अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान सोने २,५०० डॉलरपर्यंतही पोहोचू शकतं, असं मानलं जात आहे.
5 / 6
सराफांच्या सततच्या खरेदीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीच्या ट्रेंडमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात सलग पाच सत्रांपासून वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव ५५० रुपयांनी वधारून ७५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता.
6 / 6
सराफांच्या सततच्या खरेदीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीच्या ट्रेंडमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात सलग पाच सत्रांपासून वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव ५५० रुपयांनी वधारून ७५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी