शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold-Silver Price Today: सोन्याची झळाळी पुन्हा ओसरली, चांदीही घसरली; झटपट जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 1:57 PM

1 / 8
नवी दिल्ली : सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर (MCX) आज सोन्याचे दर 144 रुपयांनी घसरले आहेत. गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात जवळपास चार हजार रुपयांनी घट झाली आहे.
2 / 8
आज सकाळी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा वायदा भाव 144 रुपयांनी घसरून 51,420 रुपयांवर पोहोचला. तसेच, एमसीएक्सवर चांदीचा दर देखील 372 रुपयांनी कमी झाला आणि सकाळी चांदी 67,953 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. दरम्यान, जवळपास महिनाभरात पहिल्यांदाच चांदी 68 हजार रुपयांच्या खाली आहे.
3 / 8
बुधवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात सोने 1,923.60 डॉलर प्रति औंसच्या दराने विकले जात होते, तर चांदी 25.11 डॉलर प्रति औंस होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, क्रुडच्या किमती घसरल्याने आता गुंतवणूकदारांचा उत्साह पुन्हा बाजारात परतला आहे.
4 / 8
भारतात सोन्याच्या आयातीमुळे चालू आर्थिक वर्षात 11 महिन्यात म्हणजे एप्रिल - फेब्रुवारीमध्ये 73 टक्के वाढले असून 45.1 अरब डॉलरपर्यंत पोहोचले आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 26.11 अब्ज डॉलर होती.
5 / 8
तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
6 / 8
काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibjarates.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
7 / 8
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
8 / 8
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसाय