शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold price today, 25 May 2022: सोन्याचा भाव घसरला, चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 3:43 PM

1 / 9
भारतीय बाजारात आज सकाळी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर सातत्याने वाढत होता. मात्र आज बुधवारी सोन्याचा दर घसरला आहे. मात्र, चांदीच्या दरात किंचित तेजी दिसून आली आहे.
2 / 9
एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 82 रुपयांनी घसरून 51,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. या पूर्वी हा दर 51,109 रुपये एढा होता.
3 / 9
चांदीच्या दरात फारसा बदल नाही - सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी, चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी सकाळी चांदीचा दर 10 रुपयांनी वाढून 61,986 रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहोचला आहे.
4 / 9
यापूर्वी चांदीचा दर 61,996 रुपये एवढा होता. चांदीची किंमत 0.02 टक्क्यांनी वाढून 62 हजारवर पोहोचली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये आज सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे.
5 / 9
कसा ठरतो सोन्याचा दर? - विशेष म्हणजे सोन्याचा दर जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
6 / 9
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
7 / 9
लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड, अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.
8 / 9
सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबीए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा सहभाग असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो.
9 / 9
आपल्या बँका सोने परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते. (सर्व फोटो - प्रतिकात्मक)
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार