Gold Price Today Break in gold boom silver also falls See how much the price fell on May 22
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:40 PM1 / 5सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी उच्चांकी पातळीनंतर घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही घसरण सुरूच होती. भारतीय वायदा बाजारात सोन्याचा भाव 191 रुपयांनी घसरून 73,830 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 2 / 5मागील सत्रात तो 74,021 रुपयांवर बंद झाला होता. चांदी 466 रुपयांनी घसरून 94,259 रुपयांवर व्यवहार करत होती. काल चांदीचा भाव 94,725 वर बंद झाला होता.3 / 5केवळ भारतीय वायदा बाजारातच नव्हे तर जागतिक बाजारातही सोन्याची घसरण होत आहे. बेस मेटल्समधील वाढही किंचित थांबल्याचे दिसून आलंय. डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली, पण ते 2400 डॉलरच्या आसपास राहिले. स्पॉट गोल्ड 0.15 टक्क्यांनी घसरून 2,421 डॉलर प्रति औंस झाले. तर यूएस गोल्ड फ्युचर 0.5 टक्क्यांनी घसरून 2,425 डॉलरवर होता.4 / 5राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली. कमकुवत जागतिक ट्रेंड आणि नफा वसुलीमुळे सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांची घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या एका सदस्यानं महागाई पुन्हा टार्गेटवर आणण्यासाठी व्याजदर दीर्घकाळ सध्याच्या दरावर कायम ठेवणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केल्यानं सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला. 5 / 5सोन्याचा भाव 550 रुपयांनी घसरून 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 75,200 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत चांदीचा भाव 1600 रुपयांनी घसरून 94,500 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे. मागील सत्रात तो 96,100 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications