gold price today down on 21 feb 2023 and reach 5 weeks low level silver price also fall sone
Gold Rate Today: व्वा...! सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दरात मोठी घसरण By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 1:33 PM1 / 8Today Gold Rate: गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. पण, आता सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. 2 / 8सोन्याचे (Gold Rate) दर गेल्या ५ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आला असून चांदीच्या किंमतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही संधी आहे.3 / 8आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ०.११ टक्क्यांच्या घसरणीसह ५६१५२ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५६,२५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.4 / 8एमसीएक्स चांदीचा भाव ०.२१ टक्क्यांनी घसरला आणि ६५५४४ रुपये प्रति किलोवर व्यवहार झाला. चांदीचे दर गेल्या सत्रात १४० रुपयांनी वाढून ६५,७७० रुपये प्रति किलोवर बंद झाला.5 / 8आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,८४१ डॉलर वर उघडला आणि १,८४३.७५ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला. 6 / 8अमेरिकन सोन्याचा भाव ०.०९ टक्क्यांनी घसरून १,८५०.२० डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव ०.०२ टक्क्यांनी घसरून २१.७१५ डॉलर प्रति औंस झाला.7 / 8तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. 8 / 8'बीआयएस केअर अॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications