Gold price today: दिवाळीपर्यंत ५ हजार रुपयांनी महाग होणार सोनं, आजच्या घडीला ९ हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या ताजा दर... By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 1:15 PM
1 / 9 सोन्याचा सध्याचा दर सध्या रेकॉर्ड ब्रेक किमतीपेक्षा ९ हजार रुपयांनी स्वस्त आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरात फार मोठा काही बदल झालेला नाही. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सध्याचा उत्तम काळ असल्याचं जाणकार सांगतात. 2 / 9 तज्ज्ञांच्या मतानुसार सोन्याचा दर जेव्हा उतरतो तेव्हा गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करायला हवी. कारण दिवळीपर्यंत सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची चिन्हा आहेत. 3 / 9 दिवाळीपर्यंत सोनं पुन्हा एकदा ५० हजाराच्या वर पोहोचण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ५२ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 4 / 9 या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. सकाळी १०.४२ वाजता सोन्याच्या दरात ९६ रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानुसार सोन्याचा सद्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४७ हजार ६३० रुपये इतका आहे. 5 / 9 एमसीएक्सवर चांदीच्या दरात देखील आत वाढ झालेली पाहायला मिळाली. सप्टेंबरसाठीच्या दरात १९७ रुपयांच्या वाढीसह एक किलो सोन्याचा दर ६७ हजार २२१ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर डिसेंबरसाठीचा दर २२५ रुपयांच्या वाढीसह ६८ हजार ४०० रुपयांवर ट्रेंड करत होता. 6 / 9 जागतिक पातळीवर वाढती महागाई आणि त्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीचा परिणाम आगामी काळात सोन्याच्या दरावर होऊ शकतो. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर अमेरिका, युरोपसह दक्षिण पूर्व देशांमध्ये वाढू लागला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झालेली पाहायला मिळू शकते. 7 / 9 कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर ५६ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. हा दर आजवरचा सर्वाधिक दर म्हणून नोंदवला गेला. त्यामुळे सध्याच्या दराशी याची तुलना केल्यास सोनं सध्या ९ हजार रुपयांनी स्वस्त झालेलं आहे. 8 / 9 जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सोन्याच्या वाढत्या दराला आणखी बळ देणारी आहे. स्थानिक बाजारात सध्या सोन्याची कामगिरी जास्तीत जास्त ४८ हजार ५०० रुपायांच्या जवळपासच राहिली आहे. 9 / 9 पण हा स्तर ओलांडला गेला तर दिवाळीपर्यंत सोनं ५२,५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आणखी वाचा