शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा वधारले; चांदीच्या भावातही ७०० रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 9:24 AM

1 / 8
शनिवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलंय. सोन्याच्या किंमतीत 60 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
2 / 8
मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,300 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,300 रुपये इतका आहे. तर चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 69,200 रुपये मोजावे लागणार आहेत.
3 / 8
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारीही चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ होऊन ती एक किलोसाठी 69,200 रुपये इतकी झाली.
4 / 8
सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
5 / 8
एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमेक्समध्ये सोन्याच्या किंमतीत चांगली सुधारणा झाल्याने आणि रुपयांची किंमत कमी झाल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 526 रुपयांची तेजी आली आहे.
6 / 8
परदेशी चलन विनिमय बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवसाय सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य पाच पैशांनी कमी होऊन 74.37 रुपये प्रती डॉलरवर आले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,778 डॉलर प्रती औंस झाला असून चांदीचा दर 26.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
7 / 8
कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
8 / 8
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी