शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today : सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण, चांदीही झाली स्वस्त! जाणून घ्या लेसेट्स दर

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 02, 2021 8:03 PM

1 / 11
राजधानी दिल्लीत मंगळवारी सोनं आणि चांदीच्या दरांत जबरदस्त घसरण झाली. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात (Gold Price) 679 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. येथे सोन्याचे दर 44,760 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत.
2 / 11
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही पाहायला मिळाला.
3 / 11
याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट झाल्यानेही सोने बरेच स्वस्त झाले आहे. या आधीच्या सत्रात सोन्याचा भाव 45,439 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.
4 / 11
स्पॉट मार्केटमध्ये चांदीचे दर (Silver Price in Spot Market) - राजधानी दिल्लीत चांदीचे दरही जबरदस्त घसरले आहेत. येथे चांदीचे दर तब्बल 1,847 रुपये प्रति किलो ग्रॅमने घसरले आहेत. यानुसार, दिल्लीत चांदीचे दर 67,073 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आले आहेत. यापूर्वी गेल्या सत्रात चांदीचे दर 68,920 रुपये प्रति किलो ग्रॅम होते.
5 / 11
एचडीएफसी सिक्योरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, ''जागतीक बाजारपेठेतील सोन्याच्या दरातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे स्पॉट मार्केटमधील दर 679 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले आहेत.''
6 / 11
पटेल म्हणाले मंगळवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 14 पैशांनी मजबूत झाला.
7 / 11
जागतीक बाजारात सोन्या-चांदीची किंमत - अंतरराष्ट्रीय स्तरावर घसरणीनंतर सोन्याचा दर 1,719 डॉलर प्रति औंसवर आला आहे. तर चांदीचा दर 26.08 डॉलर प्रति औंसवर आला आहे.
8 / 11
वायदा बाजारात सोन्याचा दर - मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर एप्रिल, 2021 मध्ये डिलिव्हरी असलेल्या सोन्याचा दर सायंकाळी 04:19 वाजता 117 रुपये म्हणजे 0.26 टक्यांच्या उसळीसह 45,425 रुपये प्रति 10 ग्रॅम वर गेला होता.
9 / 11
जून 2021 कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सोन्याचा दर 104 रुपये म्हणजे 0.23 टक्क्यांनी वाढून 45,570 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला होता.
10 / 11
वायदा बाजारात चांदीचे दर - मल्टी कमोडिटी एक्सचेन्ज (MCX) वर सायंकाळी 04:24 वाजता मे, 2021 मध्ये डिलिव्हरी असलेल्या चांदीचा दर 419 रुपये म्हणजे 0.61 ने घसरून 68,381 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली होती.
11 / 11
जुलै, 2021मध्ये कॉन्ट्रॅक्ट असलेल्या चांदीचा दर 990 रुपये म्हणजे 1.41 टक्यांच्या घसरणीनंतर 69,161 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला होता.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार