Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात महिन्याभरात आजवरची सर्वाधिक घट; ८०० रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या डिटेल्स... By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 4:57 PM
1 / 8 सोनं खरेदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर चांगली बातमी आहे. कारण या महिन्यात सोन्याच्या दरात चांगलीच घट नोंदविण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात ८१० रुपयांची घट होऊन प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ४६,८९६ रुपये इतका आहे. 2 / 8 एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत रातोरात घट झाल्याचा परिणाम दिसून येत आहेत. याआधी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ७०६ रुपये इतका नोंदवण्यात आला होता. 3 / 8 दुसरीकडे चांदीच्या दरात देखील प्रतिकिलो १५४८ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. चांदीचा दर प्रतिकिलोसाठी ६२ हजार ७२० रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. याआधी हाच दर प्रतिकिलो ६४ हजार २६८ रुपये इतका होता. 4 / 8 आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीचा दर क्रमश: १८०६ डॉलर प्रति औंस आणि २४.०५ डॉलर प्रति औंस घटला आहे. तसंच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ८८४ रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दर ६४५३२ रुपये प्रतिकिलो इतका नोंदविण्यात आला आहे. 5 / 8 कोलकातामध्ये चांदीच्या दर ६४,७०० रुपये प्रतिकिलो असून पश्चिम बंगालमध्ये सोन्याचा दर ४८ हजार ७०० रुपये इतका आहे. 6 / 8 फ्यूचर्स ड्रेटमध्ये सोन्याचा दर १०६ रुपयांनी कमी होऊन ४७ हजार ८१७ रुपये इतका झाला आहे. तर मल्टी कमॉडिटी एक्चेंजवर डिसेंबरच्या डिलिव्हिरीसाठीचा सोन्याचा दर १०६ रुपयांनी घटल्याचं दाखवत आहे. 7 / 8 सोनं आणि चांदीच्या दरात नोव्हेंबर महिन्यात चांगली घट नोंदविण्यात आल्यानं सध्याचा काळ सोनं व चांदीच्या खरेदीसाठी चांगला मानला जात आहे. 8 / 8 नववर्षाच्या स्वागताला सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, नववर्षात सोन्याचा दर वाढला तरी वाढ किंचित स्वरुपात असेल असंही जाणकरांचं म्हणणं आहे. आणखी वाचा