Gold Price Today Good news for gold buyers Gold prices fell while silver prices rose
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचे भाव वाढले By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 3:44 PM1 / 7गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू आहे, या वाढीला आज ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. याशिवाय दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.2 / 7मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 66000 च्या वर गेला होता. आज गुरुवारी घसरणीनंतर ही किंमत 65,000 च्या जवळ आली आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारातही सोने स्वस्त होत आहे. 3 / 7आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.14 टक्क्यांनी घसरून 65808 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे.4 / 7याशिवाय आज चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. चांदीचा भाव आज 0.25 टक्क्यांनी वाढून 75357 रुपये प्रति किलो आहे.5 / 7महागाईचे आकडे पाहता जागतिक बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. आज कोमेक्सवर सोन्याची किंमत 0.25 टक्क्यांनी घसरून 2,175.30 डॉलर प्रति औंस आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. कॉमेक्सवर चांदीची किंमत 0.02 टक्के आहे.6 / 7बुधवारी IBJA वर सोन्याचा भाव 65334 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 59846 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.7 / 7तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications