gold price today on 12 june gold becomes cheaper in futures market silver rate also tumbles
Gold Silver Price : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दरात झाली घसरण, चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 1:49 PM1 / 9Gold Silver Price : गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत, आज जागतिक बाजारपेठेत सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. 2 / 9मल्टीकमोडीटी एक्सचेंज बाजारवर ऑगस्ट २०२३ मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्यामध्ये ३९ रुपये म्हणजेच ०.०७ टक्क्यांची घसरण होऊन ५९,७८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहारावर होते. 3 / 9Gold Silver Price : या अगोदर शुक्रवारी ऑगस्टमध्ये काँट्रॅक्ट सोन्याचा दर ५९,८२१ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर होता.4 / 9यासह ऑक्टोंबर २०२३ मध्ये डिलिव्हर होणाऱ्या सोन्याच्या किंमतीमध्ये ४८ रुपये म्हणजेच ०.०८ टक्क्यांची घसरणीसह ६०,०५८ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मागील सत्रात ऑक्टोबर करारासाठी सोन्याचा दर ६०,१०६ रुपये प्रति १० ग्रॅम होता.5 / 9Gold Silver Price : जुलै २०२३ मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीमध्ये ३१६ रुपये म्हणजेच ०.४३ टक्क्यांची घटीसह ७३,४८० रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. याअगोदरच्या सत्रात जुलैमध्ये कॉन्ट्रेक्टवाल्या चांदीचे दर ७३,७९६ रुपये किलोग्रॅमवर होती. 6 / 9Gold Silver Price : यासह सप्टेंबर २०२३ मध्ये डिलिव्हर होणारी चांदीमध्ये १७७ रुपयांची म्हणजेच ०.२४ टक्क्यांची घटीसह ७४,७३० रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. 7 / 9डिसेंबरमध्ये कॉन्ट्रेक्टवाली चांदी ५२३ रुपये म्हणजेच ०.६८ टक्क्यांसह ७५,८५८ रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे, या अगोदरच्या सत्रात सप्टेंबर कॉन्ट्रॅक्टमध्ये चांदीच्या किंमत ६७,३८१ रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. 8 / 9कॉमेक्सवर, ऑगस्ट २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी सोने ०.२० टक्क्यांनी कमी होऊन १,९७३.३० डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे, स्पॉट मार्केट ०.१२ टक्क्यांच्या घसरणीसह १,९५८.८८ प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते.9 / 9Gold Silver Price : कॉमेक्सवर जुलै कराराची चांदी ०.७८ टक्क्यांनी घसरून २४.२२ डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होती. त्याचप्रमाणे, स्पॉट मार्केटमध्ये तो ०.६३ टक्क्यांच्या घसरणीसह २४.१४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करत होता. आणखी वाचा Subscribe to Notifications