शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price : सोन्याच्या दरात आतापर्यंत 22 टक्क्यांची घसरण; जाणून घ्या, आणखी किती होणार घट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 9:45 AM

1 / 10
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आतापर्यंत सोन्याचे दर सुमारे 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.
2 / 10
सोन्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 57,000 च्या उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु आता सोन्याची 22 टक्क्यांनी घसरण होऊन 12,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे.
3 / 10
अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात आणखी घसरण होईल की यामध्ये वाढ होईल, असा सवाल उपस्थित होत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक आर्थिक दृष्टीकोनात सुधारणा झाल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
4 / 10
तज्ज्ञांचे मत आहे की, सोन्याचे दर जास्त काळ कमकुवत राहू शकत नाही, अशी शक्यता आहे. डॉलरमध्ये कमकुवतपणा, वाढती महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे.
5 / 10
सध्या सोन्याच्या दरात आणखी घसरण होईल, असे विश्लेषक म्हणत आहेत. असे मानले जाते की, सोन्याच्या दरात 1500 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरण होऊ शकते, त्यानंतर ते स्थिर राहील. म्हणजेच जर भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर सोने 40000 हजारांच्या खाली येऊ शकते.
6 / 10
अतिरिक्त खर्चामुळे वास्तविक अर्थव्यवस्थेत अधिक पैसे अडकण्यासोबत, मजबूत बाजार चलनवाढीची अपेक्षा आणि डॉलरच्या डाऊनट्रेंडमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात येत्या काही आठवड्यांत सोन्याच्या किंमती काही सकारात्मकता दिसून येत आहे, असे क्वांटम म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ फंड मॅनेजर चिराग मेहता म्हणाले.
7 / 10
जगातील गुंतवणूकदार अमेरिकन बाँडमध्ये जास्त गुंतवणूक करतात. बॉन्ड यील्ड आकर्षक बनविण्यासाठी मोठे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यातील गुंतवणूक कमी झाली.
8 / 10
सोन्याचे दर खाली येण्याचेही हे एक मोठे कारण आहे. याशिवाय, डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची मागणीही कमी झाली आहे. कारण, अन्य चलन धारकांना डॉलरमध्ये सोने खरेदी करणे महाग पडते.
9 / 10
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड स्ट्रॅटेजी हेड चिंतन हरिया म्हणतात की, गुंतवणूकदाराने सोन्यात गुंतवणूक करणे चांगले आहे. मागील वर्षीही सोन्याच्या परतावा 25 टक्के होता.
10 / 10
जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करीत असाल तर सोने अद्याप गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जे उत्कृष्ट परतावा देते. मात्र, तज्ञ असे मानत आहेत की, सोने 40 हजारांच्या पातळीपेक्षा खाली जाऊ शकते, त्यामुळे आपण आणखी काही दिवस प्रतीक्षा करू शकता.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय