gold prices today rises but down 11500 from record highs check silver price today on 15 march 2021
Gold Price : खूशखबर! आतापर्यंत तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; झटपट जाणून घ्या आजचा दर By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:22 AM1 / 12लग्नसराईचा सुरू झाली की सोनं खरेदीचाही ओघ वाढतो. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या वर्षीपासून ते आतापर्यंतचे सोन्याचे दर पाहता तब्बल 12 हजार रुपयांची घट झाली आहे. 2 / 12आता एप्रिल महिन्यापासून लग्नसराईचा मोसम सुरू होईल. यात तुमच्या घरी देखील सनई-चौघडे वाजणार असतील आणि सोनं खरेदीचा बेत असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण झाल्यास पुन्हा एकदा सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. 3 / 12सोने-चांदी (Gold-Silver) दरात आज तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity Exchange) सोन्याचा भाव (Gold Price Today) आज 0.4 टक्के वाढीसह 44,915 रुपयांवर आहे. 4 / 12चांदीचा दर (Silver Price Today) 0.6 टक्के वाढून 67,273 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत जवळपास 12000 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तर चांदी 11000 रुपये स्वस्त झाली आहे. 5 / 12फक्त 2021 या वर्षामध्ये सोन्याचा भाव हा जवळपास 6 हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,180 रुपये आहे. तर चेन्नई 46,170 रुपये, मुंबई 44,880 रुपये, कोलकाता 46,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.6 / 12आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यापार 0.14 डॉलरच्या तेजीसह 1,727.22 डॉलर प्रति औस इतका रेट आहे. तर चांदी 0.09 डॉलर वाढीसह 26.02 डॉलर इतकी आहे.7 / 12दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी 12 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव 291 रुपयांच्या घसरणीसह 44,059 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव शुक्रवारी 1096 रुपये कमी होऊन 65,958 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.8 / 12भारतात येत्या काळात लग्नसमारंभामुळे सोन्या-चांदीची मोठी खरेदी होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसेच 2021 मध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 9 / 122021 वर्षात सोन्याचा दर हा 63000 पर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. जर असं झालं तर सोन्यात गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटन याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 12फक्त मार्च महिन्याची आकडेवारी पाहता सोन्याच्या दरात आतापर्यंत 2238 रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. तर जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 5870 रुपयांची घट झाली आहे.11 / 12केडिया कमॉडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीत घट होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात 2.5 टक्क्यांची घट करण्यात आल्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांत मोठी घट झाली. 12 / 12गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार नफेखोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. केडिया यांच्या माहितीनुसार येत्या काळात सोन्याची प्रति 10 ग्रॅमसाठीची किंमत 42,500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications