शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate : सोने झाले आणखी स्वस्त, गाठला ६ महिन्यांचा नीचांकी स्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:12 AM

1 / 6
जगभरातील चलनांच्या तुलनेत भक्कम झालेला डॉलर आणि महागाईमुळे जगभरात व्याजदरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
2 / 6
मंगळवारीही जागतिक बाजारात प्रति औंस २४ कॅरेट सोने दीड वर्षांच्या सर्वांत निचांकी स्तर म्हणजे १६३७ डॉलरवर आले आहे, जे एप्रिल २०२० नंतर सर्वांत निचांकी स्तर आहे, तर भारतात सोने ६ महिन्यांच्या निचांकी स्तरावर आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची अधिक पडझड झाल्याने भारतात सोन्याच्या किमती अधिक उतरलेल्या नाहीत.
3 / 6
गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत ७ टक्क्यांनी घसरली असून, भारतात मात्र सोन्याची किंमत केवळ २ टक्क्यांनी कमी झाली आहे. सोने स्वस्त झाल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना झटका बसला असला तरीही ग्राहक आणि दुकानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुढील चार महिन्यांमध्ये प्रत्येक व्यक्ती सोन्याची सरासरी २० ग्रॅम खरेदी करण्याची शक्यता आहे.
4 / 6
आर्थिक मंदीची घसरण, सतत मजबूत होत असलेला डॉलर आणि महागाई कमी करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका वाढवत असलेला व्याजदर याचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
5 / 6
शेअर बाजारात चढउतार होत असताना सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते. मात्र, गेल्या वर्षभरापासून अशी स्थिती पाहायला मिळत नाही. सोने आयातीमध्ये जवळपास ५०%नी घट झाली आहे.
6 / 6
दागिन्याची किंमत - मुंबई : ४६,०००, चेन्नई : ४६,५००, नवी दिल्ली : ४६,१५०, भोपाळ : ४६,७८० प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट इतकी झाली आहे.
टॅग्स :GoldसोनंIndiaभारत