Gold Rate: ब्रिटनच्या नव्या कोरोनाने सोन्याचे दर वाढायला प्रारंभ; पुन्हा रेकॉर्ड करणार? By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 10:56 PM
1 / 10 गेल्या तीन महिन्यांपासून कमी जास्त होत असलेल्या सोन्याने पुन्हा एकदा चिंता वाढविली आहे. गेल्या 5 दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ दिसत आहे. 2 / 10 सोमवारी ब्रिटनच्या कोरोनाच्या धास्तीने एकीकडे शेअरबाजार धाडकन कोसळला असताना सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या व चांदीच्या दरांनी भारतीय रिटेल बाजारात वाढ नोंदविली आहे. 3 / 10 दिल्लीमध्ये सोन्य़ाच्या दराने पुव्हा 50 हजारांचा आकडा पार केला असून आज 496 रुपयांची वाढीने 50,297 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर मुंबईच्या रिटेल बाजारात सोन्याच्या दरात 200 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. याची किंमत 50308 रुपये झाली आहे. 4 / 10 सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसली आहे. सोमवारी दिल्लीत चांदी 2,249 रुपयांनी वाढून 69,477 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर मुंबईच्या बाजारात चांदीच्या किंमतीत 673 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत चांदीचा दर 67,192 रुपये आहे. 5 / 10 जाणकारांनुसार युरोपमध्ये कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा सापडलेला नवीन प्रकार यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी झपाट्याने शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यात गुंतवायला सुरुवात केली आहे. 6 / 10 सोमवारी कॉमेक्सवर सोने 1900 डॉलर पार गेले होते. य़ामुळेच MCX वर सोन्याने 51,000 रुपयांच्या टप्प्याकडे कूच सुरु केली आहे. MCX वर चांदी 70,500 रुपयांपलिकडे गेली आहे. 7 / 10 लॉकडाऊनमध्य़े मार्च ते ऑगस्ट पर्यंत सोन्याचे दर चढेच होते. मात्र, चीन आणि रशियाच्या कोरोना लसीच्या बातम्यांनी सोन्याची चमक उतरू लागली होती. नोव्हेंबरमध्ये तर चार वर्षांतली मोठी घसरण नोंदविली होती. आता पुन्हा सोने वाढू लागले आहे. 8 / 10 यंदा सोन्याने मोठी झेप घेत ऑल टाईम रेकॉर्ड केले होते. सोने ७ ऑगस्टला 56200 रुपयांवर गेले होते. आता या दरात १० टक्क्यांची घसरण झाली होती. तर चांदीच दर हा १० ऑगस्टला 78,256 रुपये झाला होता. 9 / 10 पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात होती. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता होती. मात्र, जगभरात कोरोनाच्या नव्या व्हायरसची लाट पाहता सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 10 / 10 मंगळवारीही सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सोने ७ ऑगस्टचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा