शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 5:08 PM

1 / 9
सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्यातील गुंतवणुकीकडे पाहतात. कारण सोन्याच्या किंमती कमी होतात, पण वाढल्यानंतर त्या पूर्वीच्या किंमतीपेक्षाही वर जातात. आतापर्यंतच्या तसा इतिहास आहे.
2 / 9
आजघडीला (४ ऑक्टोबर २०२४) 10 ग्रॅम सोने खरेदी करायचे म्हटले तर 77000 रुपये द्यावे लागतात. पण एक वेळ अशी होती की, 99 रुपयात 10 ग्रॅम सोने यायचे. ते वर्ष होते १९५०.
3 / 9
भारताला स्वातंत्र्य मिळाले. १९५० मध्ये संविधान लागू झाले, तेव्हापासूनच सोने हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय झाला. हळूहळू सोन्याच्या किंमती कमी-जास्त होत गेल्या. दहा वर्षांनी म्हणजे १९५९ मध्ये सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम १०२ रुपयांवर पोहोचल्या. पण, याच वर्षात सोने प्रति १० ग्रॅममागे ९ रुपयांनी वाढले आणि १११ रुपयांवर किंमती गेल्या.
4 / 9
एक दशकानंतर म्हणजे १९७० मध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमला १८४ रुपये झाली. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण कमी आणि वाढ जास्त होत गेली.
5 / 9
पुढच्या एका दशकात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमला १००० रुपयांपर्यंत पोहोचले. १९८० मध्ये सोन्याची किंमत १३३० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली. पुढच्या पाच वर्षात सोन्याचे दर २००० रुपयांच्या पुढे गेले आणि प्रति १० ग्रॅमचे दर २१३० रुपयांवर पोहोचले.
6 / 9
१९९० मध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्थेचा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. तेव्हा सोन्याची किंमत ३२०० रुपये प्रति १० ग्रॅम होती. पाच वर्षांनी सोन्याचे दर ४६८० रुपयांवर गेले. साल २००० पर्यंत सोन्याचे दर ४४०० च्या आसपास राहिले.
7 / 9
त्यानंतर सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढत गेल्या. २००७ मध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅममागे १०,८०० रुपये झाली. २०१० मध्ये १८५०० रुपये प्रति ग्रॅमपर्यंत सोन्याची किंमत पोहोचली.
8 / 9
आजपासून बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम २८००६ रुपये इतक्या होत्या. भारतात कोरोना येण्यापूर्वी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमला ४८६५१ रुपये होते. २०२१ मध्ये ते ५००४५ वर पोहोचल्या.
9 / 9
२०२२ मध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२९५० रुपये होती. ऑगस्ट २०२३ मध्ये ती प्रति १० ग्रॅमसाठी ६०००० च्या पुढे गेली. २०२४ मध्ये मध्ये आजघडीला सोन्याचे दर ७७००० च्या पुढे गेले आहेत. मागील ७३ वर्षांच्या काळात सोन्याच्या किंमती ७७७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याचे दर दरवर्षी ७ ते ८ टक्क्यांनी वाढत राहिल्या आहेत. याच वेगाने सोन्याच्या किंमती पुढील दोन अडीच वर्षात प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
टॅग्स :GoldसोनंInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसायMarketबाजार