शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा ताजा दर अन् खास टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 6:22 PM

1 / 9
आठवड्याच्या सुरुवातीला आज सोन्याच्या दरात किंचितशी घसरण नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात ४२ रुपयांची घट नोंदविण्यात आली असून सध्याचा दर ४५,९६० रुपये इतका आहे.
2 / 9
चांदीच्या दरातही आज घसरण झाली असून सध्या चांदीचा दर प्रतिकिलो ६१,४६९ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.
3 / 9
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज दुपारी साडेचार वाजता सोन्याचा दर १.२० डॉलरनं घसरून १७७७ डॉलर प्रतिऔंस इतक्या पातळीवर होता.
4 / 9
एमसीएक्सवर सोन्याचा दर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीसाठी ४० रुपयांनी घसरुन ४६ हजार ९०० रुपयांवर ट्रेंड करत होता. तर डिसेंबरसाठी सोन्याचा दर २४ रुपयांनी घसरून ४७,०७० रुपयांवर ट्रेंड करत होता.
5 / 9
एमसीक्सवर चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली आहे. सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदीच्या दरात ४४० रुपयांची घट नोंदविण्यात आली असून चांदी प्रतिकिलो ६२ हजार ७९८ रुपयांवर ट्रेंड करत होतं.
6 / 9
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी टिप्स... कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणेला गती मिळण्याची शक्यता आहे. यूबीएस ग्रूपच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १६०० डॉलर आणि चांदी २२ डॉलरच्या पातळीवर येऊ शकते.
7 / 9
याउलट गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात आगामी काळात पुन्हा वाढ होऊन २००० हजार डॉलरवर सोनं पोहोचेल.
8 / 9
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं आणि चांदीच्या किमतीवर थोडा दबाव पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात ०.११ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति औंस १,७७६.२० डॉलरच्या तापळीवर व्यवहार करीत होते.
9 / 9
तर चांदीचा दर ०.७७ टक्क्यांच्या घसरणीसह २३.५९ डॉलर प्रतिऔंसच्या पातळीवर ट्रेंड करत आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसाय