Gold rate today 6 august Gold tumbles 283 silver declines by 661 rupees
Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, रुपया झाला मजबूत; जाणून घ्या ताजा दर... By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 6:17 PM1 / 8आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतीवर दबाव दिसून आला आहे. आज दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं २८३ रुपयांच्या घसरणीसह ४६ हजार ५७० रुपयांवर पोहोचलं आहे. 2 / 8गेल्या सत्रात सोन्याचा हाच दर ४६ हजार ८५३ रुपये इतका होता. या आठवड्यात लागोपाठ पाचव्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारलेला पाहायला मिळाला. आज रुपयाचा डॉलरच्या तुलनेतील भाव २ पैशांच्या वाढीसह ७४.१५ इतका नोंदवला गेला.3 / 8सराफा बाजारात आज चांदीच्या दरातही ६६१ रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीचा सध्याचा दर प्रतिकिलो ६५ हजार ५१४ रुपये इतका नोंदवला गेला आहे. 4 / 8सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. ताज्या दरानुसार सोन्याच्या किमतीत १०.३५ डॉलरच्या घटीसह १७९८.५५ डॉलर प्रतिऔंस स्तरावर बंद झाला आहे. 5 / 8एमसीएक्सवर दुपारी पाच वाजता ऑक्टोबरसाठीच्या सोन्याचा दर १६६ रुपयांच्या घटीसह ४७ हजार ४३७ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर डिसेंबरसाठीचा दर १८५ रुपयांच्या घटीसह ४७ हजार ६२३ रुपयांवर ट्रेंड करत होता. 6 / 8एमसीएक्सवर चांदीच्या दरातही घट झाल्याचं पाहायला मिळालं. सप्टेंबरसाठीचा चांदीचा दर ४०३ रुपयांच्या घटीसह प्रतिकिलो ६६ हजार ५९५ रुपयांवर ट्रेंड करत होता. 7 / 8दरम्यान सलग पाचव्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचं पाहायला मिळालं. रिझर्व्ह बँकेनं आज पतधोरण जाहीर करताना सलग सातव्यांदा व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. 8 / 8अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबूती मिळाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर आज ७४.१५ वर बंद झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications