शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate Today: मस्तच! सोन्याच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या १० ग्रॅमसाठीचा लेटेस्ट भाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 4:55 PM

1 / 8
सोन्याच्या दरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरणची नोंद झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज प्रति १० ग्रॅमसाठी ४६४ रुपयांची घसरण झाली आहे.
2 / 8
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा आजचा लेटेस्ट दर प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ७०५ रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात हाच दर ४८ हजार १६९ रुपयांवर बंद झाला होता. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरणीची नोंद झाली आहे.
3 / 8
चांदीच्या दरात आज तब्बल ७२३ रुपयांची घट झाली आहे. चांदीचा आजचा भाव प्रति एक किलोसाठी ७० हजार ४१० रुपयांवर बंद झाला. तर गेल्या आठवड्यात हाच दर ७१ हजार १४३ रुपये इतका होता.
4 / 8
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात २१.८५ डॉलरच्या घसरणीसह आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,८५७.७५ डॉलर प्रतिऔंस इतका नोंदवला गेला आहे. तर चांदीच्या दरात १.१५ टक्के घट झाली आहे. चांदीचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या २७.८२३ डॉलर प्रतिऔंस इतका नोंदविण्यात आला आहे.
5 / 8
डॉलरच्या किमतीत तेजी आल्यानं सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे, असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितलं. तर सोन्याच्या किंमत सध्या गेल्या आठवड्याभराच्या सर्वात निच्चांकी स्तरावर आहे आणि या आठवड्यात अमेरिकी फेडरलची बैठक होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे, असं मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे नवनीत दमानी यांनी सांगितलं.
6 / 8
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत सलग पाचव्यांदा रुपया घसरल्याचं पाहायला मिळालं. आज डॉलरच्या तुलनेत रुपया २२ पैशांनी घसरून एका डॉलरमागे रुपयाचा दर ७३.२९ रुपये इतका पोहोचला आहे.
7 / 8
सोन्याच्या आगामी काळातील डिलिव्हरी रेटमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. MCX वर आज दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी ऑगस्टसाठीचा सोन्याचा दर ५६४ रुपयांनी घट होऊन ४८ हजार ३३९ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर ऑक्टोबरच्या डिलिव्हरी रेटसाठी ५२० रुपयांची घट होऊन ४८ हजार ७०५ रुपयांवर ट्रेंड करत होता.
8 / 8
चांदीच्या डिलिव्हरी रेटमध्येही घट झाल्याचं पाहायला मिळालं. MCX वर जुलैसाठीच्या चांदीच्या दरात ७३७ रुपयांची घट होऊन ७१ हजार ४९० रुपयांवर ट्रेंड करत होता. तर सप्टेंबरसाठीचा दर ७२० रुपयांची घट होऊन ७२ हजार ६५१ रुपयांवर ट्रेंड करत होता.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसाय