Gold rate today Gold tumbles 317 silver declines 1128 rupees on 9 august
Gold Rate: सोनं खरेदीचं उत्तम 'टायमिंग'! मोठ्या घसरणीची नोंद; जाणून घ्या लेटेस्ट दर... By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 7:20 PM1 / 8सोन्याच्या दरात आज ३१७ रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल १ हजार १२८ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. 2 / 8दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा क्लोजिंग दर प्रतितोळा ४५ हजार ३९१ रुपये इतका होा. शुक्रवारी हाच दर ४५ हजार ७०८ रुपये इतका होता.3 / 8चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा आजचा दर प्रतिकिलो ६२ हजार ५७२ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा दर ६३ हजार ७०० रुपये इतका होता. 4 / 8आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं सध्या १.१६ टक्क्यांच्या घटीसह १७४२,६५ डॉलर प्रतिऔंस स्तरावर ट्रेंड होत आहे. तर चांदी १.७४ टक्क्यांच्या घटीसह २३.९०२ डॉलर प्रति औंस इतक्या स्तरावर पोहोचलं आहे. 5 / 8जुलै महिन्यात अमेरिकी जॉब मार्केटमध्ये डेटा मजबूत झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदीच्या किमतीत घट दिसून येत असल्याचं एचडीएफसीचे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितलं. 6 / 8एमसीएक्सवर दुपारी ४ वाजून ४६ मिनिटांनी ऑक्टोबरसाठीचा सोन्याच्या डिलिव्हरीचा दर ४४५ रुपयांच्या घटीसह ४६ हजार १९५ रुपये इतका ट्रेंड करत होता. तर डिसेंबरसाठीचा दर ४६४ रुपयांच्या घटीसह ४६ हजार ३१२ रुपयांवर ट्रेंड करत होता. 7 / 8एमसीएक्सवर चांदीच्या दरातही घट झालेली पाहायला मिळाली. सध्या सप्टेंबर महिन्यासाठीचा चांदाचा दर १०८० रुपयांच्या घसरणीसह ६३ हजार ९२० रुपयांवर ट्रेंड करत होता. 8 / 8सलग पाचव्यांदा डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असताना आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात घट नोंदविण्यात आली. रुपया आज ११ पैशांनी घट होऊन ७४.२६ रुपयांवर आला. आणखी वाचा Subscribe to Notifications