Gold Rate Today latest rate of gold and silver on 24 june 2021
Gold Rate Today : पुन्हा 47 हजार रुपयांच्या खाली आलं सोनं; जाणून घ्या आजचा दर, हीच आहे गुंतवणुकीची 'सुवर्णसंधी' By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 3:24 PM1 / 10सोन्याचे (price of gold) दर गुरुवारी पुन्हा घसरले. MCX वर ऑगस्त डिलिव्हरीच्या सोन्याची सकाळी 122 रुपयांच्या घसरणीसह सुरुवात झाली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे 182 रुपयांच्या घसरणीसह म्हणजेच, साधारणपणे 0.39 टक्क्यांच्या घसरणीसह 46,890 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने ट्रेड करत होते. (Gold Rate Today latest rate of gold and silver on 24 june 2021)2 / 10सकाळच्या सत्रात हा दर 46,950 रुपयांच्या उच्चांकावर आणि किमान 46,811 रुपयांवर पोहोचला होता. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही घसरण बघायला मिळत आहे. 3 / 10जुलै डिलिव्हरीची चांदी सकाळी 11 वाजता 364 रुपयांनी घसरून 67,568 रुपये प्रति किलोवर आली होती.4 / 10सराफा किंमतीत तेजी - तत्पूर्वी, सोन्याच्या दरात बुधवारीही तेजी दिसून आली होती. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने 110 रुपयांनी महाग होऊन 46,396 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. यापूर्वीच्या सत्रात सोन्याचा दर 46,286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.5 / 10दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही तेजी दिसून आली होती. बुधवारी चांदीच्या किंमतीत 324 रुपयांची वाढ दिसून आली. यानंतर चांदीचा दर 66,864 रुपये प्रति किलो (Silver price today)वर पोहोचला. गेल्या सत्रात चांदीचा दर 66,540 रुपये प्रति किलो होता.6 / 10गेल्या आठवड्यात झाली होती मोठी घसरण - सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी घसरण बघायला मिळाली. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दर 2000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही अधिक घसरले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 7 / 10शुक्रवारी सोन्याचा दर एमसीएक्सवर 46,800 रुपयांवर बंद झाला होता. अशा प्रकारे सोने आपल्या विक्रमी किंमतीपेक्षा 9,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्ली सराफा बाजारातही यात संपूर्ण आठवड्यात 882 रुपयांची घसरण झाली आहे.8 / 10का घसरले दर - कमोडिटी एक्सपर्ट्सनुसार, अमेरिकन फेडरल रिझर्वने (US Fed Reserve) 2023 मध्ये दोन वेळा व्याजदर वाढविण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर जगातील दुसऱ्या मुख्य करंसीजच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. यामुळेच गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले. अमेरिकन इकॉनमीच्या तुलनेत फेडरल रिझर्वचा आशावादी दृष्टीकोन बॉन्ड यील्ड (bond yield) मध्ये मोठी तेजी दिसून आली आहे.9 / 10गुंतवणुकीची सुवर्णसंधी - कमोडिटी एक्सपर्ट्सनी म्हटले आहे, की पुढील तीन-चार दिवसांसाठी सोन्याचादर कमी होऊ शकतो. आणखी स्वस्त होऊन सोने 45,500 रुपयांपर्यंत घसरू शकते. मात्र, पिवळ्या धातूची घसरण तात्पुरती आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करणारांनी किंमतीत घसरण झाल्याचा फायदा घ्यायला हवा.10 / 10 कमोडिटी एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे, की सोन्याचे दर पुन्हा वाढतील आणि पुढील एक महिन्यात हे दर 48,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications