शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात तेजी! आणखी वाढणार भाव, जाणून घ्या आजची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 3:21 PM

1 / 9
गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू होती, पण आता इस्त्रायल आणि हमासच्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत.
2 / 9
Gold Rate Today: डॉलरच्या स्थिर निर्देशांकामुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचा व्यापार मर्यादित राहिला, पण सलग तिसऱ्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.
3 / 9
चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि इतर शहरांसारख्या प्रमुख भौतिक सराफा बाजारात सोन्याची किंमत ५९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १ किलो चांदीची किंमत ७२,५०० रुपये आहे.
4 / 9
Gold Rate Today: एमसीएक्स डिसेंबर सोन्याचे फ्युचर्स बुधवारी २२ रुपये किंवा ०.०४% च्या वाढीसह ५७,६५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते.
5 / 9
दरम्यान, डिसेंबरचा चांदीचा भाव ११७ रुपये च्या वाढीसह ६९,०३५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.
6 / 9
एमसीएक्स गोल्ड सलग तिसऱ्या सत्रात वधारले. सहा शीर्ष जागतिक चलनांच्या तुलनेत, डॉलर निर्देशांक (DXY) ०.०७ डॉलरने खाली आला आणि १०५.७६ च्या जवळ होता.
7 / 9
Gold Rate Today: कॉमेक्सवर सोन्याचे फ्युचर्स बुधवारी १.१० डॉलर खाली १,८७४.२० डॉलर प्रति ट्रॉय औंस वर व्यापार करत होते, तर चांदीचे फ्युचर्स ०.५७० डॉलर किंवा १.२६०% वर २२.०१० डॉलरवर होते.
8 / 9
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चालू असलेल्या इस्रायल-हमास संकटाने सोन्याचे दर वाढले आणि गुंतवणूकदार, फंड हाऊस आणि जागतिक मध्यवर्ती बँकांमध्ये सुरक्षितेचे आकर्षण वाढले आहे. DXY देखील ओव्हरबॉट झोनच्या खाली घसरला आहे आणि सोन्याच्या किमतीला पाठिंबा दर्शवत आहे.
9 / 9
मासिक आधारावर सोन्याच्या फ्युचर्समध्ये ०.०५% ने वाढ झाली आहे, तर वार्षिक आधारावर ४.७५% ने वाढ झाली आहे. चांदीच्या फ्युचर्सचा विचार करता, ऑक्टोबरमध्ये १.३४% घसरण झाली आहे, तर यावर्षी ०.७१% ने घसरण नोंदवली आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी